दीपक मोहिते,
सीमेवर पाकचा गोळीबार ; भारतीय सैन्याचे चोख प्रत्युत्तर,
पाकिस्तानच्या सैन्याने सीमेवर असलेल्या आपल्या चौक्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.भारताने पाकिस्तानवर कठोर निर्णय लादल्यानंतर पाकिस्तानने देखील ताठर भूमिका स्विकारली आहे.त्यांनीही आपल्यावर निर्बंध लादले असुन सीमावर्ती भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे.त्यांच्या गोळीबाराला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून सुरू असलेल्या तणावादरम्यान पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरुच आहेत.जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे.नियंत्रण रेषेवरील अनेक पाकिस्तानी चौक्यांवरून गोळीबार झाला,परंतु त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही,असे सूत्रांनी सांगितले.
पाकिस्तानने गुरुवारी भारतासोबतचा शिमला करार आणि इतर द्विपक्षीय करार स्थगित केले आहेत.तसेच आपल्यासोबत असलेल्या व्यापारावर बंदी घातली आणि भारतीय विमान कंपन्यांसाठी आपली हवाई हद्द बंद केली. यासोबतच,सिंधू जल करारांतर्गत दिलेला पाण्याचा प्रवाह थांबवण्याचा किंवा बदलण्याचा कोणताही प्रयत्न आमच्या देशाविरुद्ध युद्ध पुकारण्यासारखे मानले जाईल,असेही पाकिस्तानने आपल्याला सुनावले आहे.
गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने राजस्थान राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर आपल्या सैनिकांची तैनाती वाढवली आहे.हा भाग बहावलपूरचा आहे.जेथे जैश-ए-मोहम्मदचे मुख्य मुख्यालय आहे.पाकिस्तानी लष्कराने ३१ व्या कोअरचे लेफ्टनंट जनरल साकिब महमूद मलिक यांना याबाबत थेट सूचना दिल्या आहेत. जैशच्या मदरशाची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे.पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी येथे हवाई संरक्षण आणि रडार यंत्रणा सक्रिय ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पाकिस्तानने वाघा बॉर्डर क्रॉसिंग देखील बंद केली असुन सार्क व्हिसा एक्झम्पशन स्कीम ( एसव्हीइएस ) अंतर्गत भारतीय नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा निलंबित केले आणि भारतीय उच्चायुक्तालयातील लष्करी सल्लागारांना निघून जाण्यास सांगितले आहे.पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर या घोषणा करण्यात आल्या.
पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने १९६० चा सिंधू जल करार स्थगित केला.पाकिस्तानसोबतचे राजनैतिक संबंध कमी करण्याची घोषणा केली.भारताने सिंधु पाणी करार स्थगित करणे, पाकिस्तानी नागरिकांसाठी भारतीय व्हिसा बंद, पाकिस्तानी दुतावासांना भारत सोडण्याचे आदेश,अटारी वाघा बॉर्डर १ मे पर्यंत बंद राहणार आहेत.भारतातील पाकिस्तानी वकिलात बंद करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
आपल्या देशाने पाकिस्तानवर विविध निर्बंध लावल्यानंतर पाकिस्तान घाबरल्याची हाकाटी आपल्या वृत्तवहिनींनी पिटण्यास सुरुवात केली.पण प्रत्यक्षात तशी स्थिती नाही.उलट त्यांनीही आपल्यावर कडक निर्बंध लादले.तसेच सीमावर्ती भागात असलेल्या भारतीय चौक्यावर तुफान गोळीबार केला.त्याला आपल्या जवानांनी चोख उत्तर दिले.या गोळीबारामुळे सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Trending
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…

