सचिन परब,विरार
लायन्स क्लबतर्फे आगाशी जिल्हा परिषद शाळेला बेंचेसची भेट,
राज्यातील जिल्हा परीषद शाळांची दुर्दशा व दिवसेंदिवस कमी होत चाललेली विद्यार्थ्यांची संख्या ही चिंतेची बाब ठरत आहे.गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजातील अनेक सेवाभावी संस्था नेहमीच खारीचा वाटा उचलत असतात.
विरारमधील एका शाळेला लायन्स क्लबकडून मदतीचा हात देण्यात आला आहे.या मदतीमुळे विद्यार्थ्याँना दिलासा मिळाला आहे.
वसई तालुक्यातील आगाशी येथील जिल्हा परिषद शाळा ही एकेकाळी नावाजलेली अशी शाळा.बदलत्या काळात इंग्रजीच्या ओढ्यामुळे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या उतरणीला लागली.तसेच शासनाच्या शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे या शाळेची पार दुरावस्था झाली आहे. शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना सध्या अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत होते.या शाळेत मुलांना बसायला बेंच नसल्यामुळे विद्यार्थीही शाळेमध्ये यायला तयार नसत.अशावेळी येथील शिक्षकांनी परिसरातील समाजसेवक सचिन म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला. सचिन म्हात्रे यांनी माजी डिस्ट्रिक्ट गवर्नर लायन डॉ. प्रशांत पाटील यांच्या कानावर घातली.त्यांनी लगेच शाळेची पाहणी करून लायन्स क्लब ऑफ मुंबई एंजलच्या लायन सूरज जैन यांना विनंती केली. त्यांनी या शाळेसाठी सुंदर रंगीत बेंचेस व एका टीव्हीची संचाची भेट देण्याचे कबूल केले.त्यांनी दिलेल्या आश्वासानाची तत्परतेने पूर्तता केली व विद्यार्थ्यांना बेंचेस, टिव्ही तसेच खाऊचे वाटप केले.सदर कार्यक्रमाला लायन डॉ प्रशांत पाटील,लायन सूरजबेन जैन,लायन निनाबेन शहा,समाजसेवक सचिन म्हात्रे,लायन संगीता जैन इ. मान्यवर उपस्थित होते.

