जव्हार प्रतिनिधी,
जिजाऊ रथयात्रेचे जव्हार नगरीत भव्य स्वागत,
“ बहुजन मराठा जोडो अभियान,” अंतर्गत महाराष्ट्रभर प्रवास करणारी जिजाऊ रथयात्रा काल ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या जव्हार नगरीत दाखल झाली.विविध परंपरा,ऐक्य आणि बहुजनांच्या संघर्षांचा वारसा मांडणारी,ही यात्रा जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसादाने संस्मरणीय ठरली.
यात्रेच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिरपामाळ येथे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला वंदन करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.त्यानंतर यात्रेने आदिवासी क्रांतिकारक चौक गाठले,जेथे पारंपरिक तारपा नृत्य पथक साखरशेत यांनी सादर करून आदिवासी समाजाच्या थोर क्रांतिकारकांना आदरांजली वाहण्यात आली.सांस्कृतिक परंपरेच्या अभिव्यक्तीचा हा भाग उपस्थितांमध्ये भारावणारा ठरला.त्यानंतर सहविचार सभा व ” बहुजन समाज भूषण,” पुरस्कार वितरण साई-महाल येथे आयोजित सहविचार सभेत, बहुजन समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १३ मान्यवरांचा “बहुजन समाज भूषण २०२५” या पुरस्काराने गौरव करण्यात आला.
समाजातील शिक्षण,कृषी, प्रशासन,पत्रकारिता,वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये विमलताई नारायण पटेकर,ज्योती हरिश्चंद्र भोये, ऍड.राजाराम अनुसया पांडुरंग मुकणे,रियाज हाजरा युसूफ मनियार,
इमरान शाहिदा शब्बीर कोतवाल,दिलीप भिकुबाई पिराजी आवारे,सय्यद खलील सुलेमान कोतवाल,मनोज शेवंती कमा कामडी,संदीप सुमन दत्तात्रय साळवे,रवी मथीबाई लक्ष्मण बुधर,सचिन वच्छलाबाई संतोष भामरे, गुलाब कुसुम ज्योतिबा राडे, संगीत अकादमी राष्ट्रीय पुरस्कार विजेते भिकल्या धिंडा यांचा गौरव करण्यात आला.त्यानंतर यात्रेने यशवंत मोर्चा,डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक,गांधी चौक, तारपा चौक तसेच श्रीमंत राजे यशवंतराव मुकणे स्मारक येथे जाऊन वंदन केले.हा प्रवास केवळ सन्मानाचा नव्हता,तर सामाजिक एकतेचे दृढ प्रतीक होता.सदर कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे राज्य,विभागीय आणि जिल्हास्तरीय पदाधिकारी तसेच संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रमुख मान्यवर म्हणून शिवश्री अर्जुनराव तनपुरे ( राज्य समन्वयक ), शिवश्री माणिक यादव ( जिल्हा प्रवक्ते ), शिवश्री उमाकांत उफाडे, शिवश्री मांगीराम चोपडा,शिवश्री नितीन मोकाशी,शिवश्री सुनील नाना अहिरे, शिवश्री जगन्नाथ बेनवाड, शिवश्री तेजस भोईर,शिवश्री सुनील पाटील, शिवश्री एस. एन. पाटील शिवश्री वसंत धांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सदर संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत काटेकोरपणे पार पाडण्यात आले.सदर जिजाऊ रथयात्रा बहुजन मराठा जोडो अभियान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवश्री इमरान कोतवाल, शिवश्री शिवराज डावळे, शिवश्री प्रशांत रुकारी, शिवश्री दिलीप आवारे, शिवश्री सचिन भामरे, शिवश्री दत्तू गावित,शिवश्री हितेश मोडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रथयात्रेचे प्रत्येक टप्पे सुरळीत पार पाडले.संपूर्ण कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची जबाबदारी मच्छिन्द्रनाथ देवढे यांनी समर्थपणे पार पाडली, तर आभार प्रदर्शन संतोष बिराजदार यांनी केले.

