वसंत भोईर,वाडा
कुडूस ग्रामपंचायत हद्दीतील गटारे कच-याने तुडुंब भरलेली,
तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायत हद्दीतील गटारे प्लास्टिक व विविध कच-याने भरल्या असून त्याची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्यात यावी,अन्यथा पावसाळ्यात कुडूसमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी कुडूस ग्रामपंचायतीने योग्य ती दखल घेऊन नागरिकांना दिलासा मिळवून द्यावा.
कुडूस ही ग्रामपंचायत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे.तसेच ती आर्थिकदृष्ट्या सक्षमही आहे,परंतु या ग्रामपंचायतीकडून सफाईची कामे प्रभावीपणे करण्यात येत नाहीत.येथे मोठी बाजारपेठ असून शुक्रवारी येथे आठवडा बाजार भरतो.या बाजारात अनेक छोटे मोठे व्यापारी येतात असतात.हे व्यापारी माल विक्री करून झाल्यावर उरलेला कचरा असाच अस्ताव्यस्त टाकत असतात. तसेच येथील व्यापारीही आपल्या दुकानातील कचरा गटार परिसरात टाकत असतात.त्यामुळे हा कचरा गटारात जाऊन साचतो व गटार कच-याने तुडुंब भरून जाते.कुडूस गावातील अनेक गटारे कच-याने भरल्या आहेत.त्याची सफाई न केल्यास पावसाळ्यात पाणी भरून गटारे तुंबण्याची भिती नागरिक व्यक्त करीत आहेत.
गेल्या वर्षी पावसाळ्यात पाणी तुंबून व्यापा-यांच्या दुकानात पाणी गेले होते. त्यामुळे त्यांच्या सामानाचे मोठे नुकसान झाले होते.यंदा ही घटना टाळण्यासाठी पावसापूर्वी सर्व गटारांची सफाई करण्यात यावी,अशी मागणी नागरिक करत आहेत.

