वसंत भोईर,वाडा
१९ हजार रू.ची लाच घेताना सरपंचाला रंगेहाथ पकडले,
तालुक्यातील सापरोंडे मांगाठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा गवारी यांना ग्रामपंचायत कार्यालय विस्तारिकरण करण्याच्या कामाचे मंजूर केलेल्या बिलाच्या रकमेपैकी २ टक्के प्रमाणे एकूण १९ हजार रू.ची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.त्यामुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून सरपंचावर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,वाडा तालुक्यातील सापरोंडे मागाठणे या ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा सुनिल गवारी वय ३६ या आहेत.येथील ग्रामपंचायत कार्यालय विस्तारिकरण करण्याच्या कामाचे मंजूर केलेल्या बिलाच्या रकमेपैकी २ टक्के प्रमाणे एकूण २० हजारांची लाच सरपंच शोभा गवारी यांनी तक्रारदार यांच्याकडे मागितली होती.तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाककडे सरपंच शोभा गवारी यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली होती,अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता सरपंच यांनी २० हजार रू.लाच स्विकारण्याची तयारी दर्शवली होती.आज कारवाई दरम्यान सापळा रचला असता तक्रारदार हे लाचेची रक्कम आरोपी यांना देण्यासाठी गेले असता सरपंच शोभा यांनी तक्रारदार यांच्याकडून तडजोडी अंती १९ हजार रू. लाचेची रक्कम स्विकारली. त्यानंतर त्यांना तत्काळ अटक करण्यात आली.
ही कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संतोष अंबिके,पोलीस हवालदार शेख,विशे,सुरवडे यांच्या पथकाने केली.
दरम्यान,सरपंचावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
१९ हजार रू.ची लाच घेताना सरपंचाला रंगेहाथ पकडले
तालुक्यातील सापरोंडे मांगाठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा गवारी यांनी ग्रामपंचायत कार्यालय विस्तारिकरण करण्याच्या कामाचे मंजूर केलेल्या बिलाच्या रकमेपैकी २ टक्के प्रमाणे एकूण १९ हजार रू.ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.यामुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून सरपंचावर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे.

