शुभम सावंत, विरार
पाकिस्तानचा झेंडा फाडुन व जोडे मारून विरार शिवसेनेने केला निषेध,
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे निष्पाप भारतीयांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा विरार शहरातील तमाम शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन उभारून पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राऊत, शिव वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष आनंद चोरघे,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष अजहर खान, शहर संघटक शिला लष्करे, शहर समन्वयक प्रदिप साने, कार्यालयप्रमुख सुनील चव्हाण,उपसचिव प्रसाद मिर्लेकर, उपशहरप्रमुख शशी कदम,जितेंद्र खाडे,उपशहर संघटक रोशनी जाधव, उपशहर अधिकारी रोहित कदम,विभागप्रमुख गणेश धावडे,सुशांत घाग,यश चोरघे, महेश लांजवळ,अजय पिंपळे, आदि शिवसेना,युवासेना, महिला आघाडी व अंगिकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

