नदीम शेख,पालघर
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पालघरमध्ये मुस्लिम समाजाकडून जोरदार निषेध,
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज पालघर शहर मुस्लिम समाजाच्या वतीने शहरातील जामा मशिदेच्या बाहेर दु.२.०० वाजता शुक्रवारची नमाज पठण केल्यानंतर निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.
पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सम्पूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. पालघरमध्येही समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने या हल्ल्याच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन करण्यात आले.यावेळी मुस्लिम समाजातील बांधवांनी हातावर काळी फीत बांधून पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली.या दरम्यान ” पाकिस्तान मुर्दाबाद,” व पाकिस्तानवर कारवाई करा व गुन्हेगारांना शिक्षा द्या,” अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी पाकिस्तान देशाचा राष्ट्रध्वज फाडून पेटवण्यात आला. यावेळी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करण्याची मागणी उपस्थित आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.
Trending
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…

