वसंत भोईर,वाडा,
वाडा तालुक्यात जागतिक हिवताप दिन साजरा,
जागतिक हिवताप दिना निमित्त आरोग्य विभागाकडून तालुक्यात विविध जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले. जिल्हा हिवताप अधिकारी अश्विनी राव,वाडा तालुका आरोग्य अधिकारी शरयू तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रा.आ.केंद्र खानीवली,प्रा.आ.केंद्र गोऱ्हे, प्रा.आ.केंद्र परळी,प्रा.आ.केंद्र कुडूस अंतर्गत विविध गावात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.
यावर्षी जागतिक हिवताप दिन ” चला हिवताप संपवू या : पुन्हा योगदान द्या,पुनर्विचार विचार करा,पुन्हा सक्रिय व्हा,” या थीम खाली साजरा करण्यात आला.प्रा.आ.केंद्र खानिवली अंतर्गत येणाऱ्या मौजे तुसे येथे वैद्यकीय अधिकारी अश्विनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तुसे गावात हिवताप जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माध्यमिक विद्यामंदिर तुसे येथील विध्यार्थ्यांना हिवताप,डेंगू,चिकन गुनिया, हत्ती रोग,याबाबत माहिती व मार्गदर्शन करण्यात आले तसेच हिवताप समूळ नष्ट करण्यासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली.माध्यमिक शाळेतील विध्यार्थ्यांनसाठी सिकसेल कॅम्प घेण्यात आला.यामध्ये विद्यार्थ्याची सिकलसेल चाचणी करण्यात आली.
प्रा.आ.केंद्र गोऱ्हे तर्फे गोऱ्हे गावात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.या वेळी विध्यार्थ्यांनी घोषणा देत डासापासून होणाऱ्या आजारा बाबत जनजागृती करण्यात आली.प्रा.आ.केंद्र परळी अंतर्गत परळी गावात जनजागृती रॅली काढून डेंगू, मलेरिया, जलदताप या सारखे साथीचे आजाराबद्दल गावात जनजागृती करण्यात आली. तसेच प्रा.आ.केंद्र कुडूस अंतर्गत ही जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.या वेळी तालुका हिवताप पर्यवेक्षक एस.एस.पाटील, आरोग्य सहाय्यक किशोर पाटील, आरोग्य निरीक्षक रामदास गोडे,आरोग्य सेवक पी.एस.भोईर,आरोग्य कर्मचारी,आशा वर्कर,शालेय कर्मचारी,विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

