- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
Author: दीपक मोहिते
संजय लांडगे,वाडा, अखेर वाडा बस स्थानकाच्या दुरुस्तीचे काम सुरु, वाडा एसटी आगार येथे काँक्रिटीकरण करण्यासाठी आजपासून खोदकाम सुरु केले असून हे काम महिनाभर चालेल,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.हे काम पूर्ण होईपर्यंत सर्व बसेस नवीन स्थानकातून सुटणार आहेत.त्यामुळे विद्यार्थी व सर्व प्रवाशांना बस पकडण्यासाठी कोर्टासमोरील बस स्थानकाकडे धाव घ्यावी लागत आहे.पहिल्याच दिवशी अनेक विद्यार्थी बस पकडण्यासाठी महामार्गांवरून चालत जाताना दिसत होते. खंडेश्वरी नाका येथे एक उपपीक पॉईंट ठेवणार होते. मात्र पहिल्या दिवशी असे काही दिसून आले नाही. खंडेश्वरी नाका येथे पीक-अप पॉईंट असेल तर दोन्ही बाजुला जाणाऱ्या प्रवाशांसाठी तात्पुरती शेड बांधणे आवश्यक असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहॆ.
अनिल वैद्य,नाशिक, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथाचे दर्शन घेतले, श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ महाराज पौषवारी तीन दिवसीय महोत्सवाचा ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शासकीय पूजेने शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्रंबकेश्वरमध्ये लाखो वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळाली.भगव्या पताका घेऊन चालणाऱ्या वारकऱ्यांमुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही निवृत्तीनाथ मंदिरात जाऊन घेतले.निवृत्तीनाथाचे दर्शन घेण्यासाठी निवृत्तीनाथ मंदिरात जाणारे पहिले गृहमंत्री म्हणून अमित शहा यांचा इतिहासात नोंद झाली आहॆ. ” निवृत्ती नामाचा निज छंद एका जनार्दनी आनंद,” या अभंगाची अनुभूती त्रंबकेश्वर येथे पौषवारी अर्थात निवृत्तीनाथ संजीवन समाधी सोहळा यात्रेनिमित्त आलेल्या लाखो वारकऱ्यांना झाली. पौषवद्य एकादशी अर्थात षटतीला संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांनी…
अनंत भोईर,पालघर, मतदारांनी मतदानाच्या अधिकाराचा वापर करावा – जिल्हाधिकारी बोडके, मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क, अधिकार आहे. त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे,निवडणूक उपजिल्हाधिकारी रवींद्र हजारे,उपजिल्हाधिकारी विजया जाधव,महेश सागर, तेजस चव्हाण तसेच वरिष्ठ अधिकारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गोविद बोडके म्हणाले की,भारतीय निवडणूक आयोगाची २५ जानेवारी १९५० रोजी स्थापना झाली.तेव्हापासून २५ जाने.हा दिवस राष्टीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो.गेल्या काही वर्षांपासून…
जव्हार प्रतिनिधी, शिवम चौधरीचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील यश : देहेरे आश्रम शाळेचा गौरव, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा,देहेरे येथील ११ वीचा विद्यार्थी शिवम विलास चौधरी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर शाळेचा आणि देशाचा गौरव वाढवला आहे. अमेरिकेतील ” Kindness Grows हेरे,” संस्थेच्या माध्यमातून आयोजित ” Kids Kindness Project,” मध्ये शिवमने ” From Darkness to लीगत,” हा प्रकल्प सादर केला.या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आदिवासी भागातील मुलांना अभ्यासासाठी सोलर लॅम्प्स उपलब्ध करून देणे,हा आहे. या प्रकल्पासाठी एकूण २८२ अर्ज आले होते, त्यापैकी फक्त ४७ प्रकल्पांची निवड करण्यात आली.विशेष म्हणजे, भारतातून फक्त शिवमच्या प्रकल्पाची निवड झाली असून,तो या उपक्रमासाठी अनुदान मिळवणारा भारतातील एकमेव विद्यार्थी…
सुशीला फातरपेकर,नालासोपारा नालासोपारा येथे ९ फेब्रु.रोजी फनस्ट्रीटचे आयोजन, मोबाईल आणि संगणकाच्या युगात दिवसें दिवस मैदानी खेळाकडे लहान मुलांसह तरुणांचा कल कमी होताना दिसत आहे.यासाठी नागरिकांना बालपणातील त्यांनी खेळलेल्या सर्व खेळाचा आनंद घेता यावा,त्यांच्यात खेळ व व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका विविध सेवाभावी संस्थांच्या मदतीने ” फनस्ट्रीट,” या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. या उपक्रमांर्तगत एकाच ठिकाणी अनेक पारंपारिक व इतर खेळात सहभागी होण्याची संधी उपलब्ध होत असून या फनस्ट्रीटच्या आयोजनामुळे वसई विरार शहरामधील नागरिकांना, विद्यार्थ्यांना त्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी व त्यांच्या मध्ये खेळांची तसेच विविध मैदानी खेळासह इतर खेळांची आवड निर्माण होण्यास मदत होणार आहे. या फनस्ट्रीटमध्ये…
सुशीला फातरपेकर,नालासोपारा नालासोपारा येथे ९ फेब्रु.रोजी फनस्ट्रीटचे आयोजन, मोबाईल आणि संगणकाच्या युगात दिवसें दिवस मैदानी खेळाकडे लहान मुलांसह तरुणांचा कल कमी होताना दिसत आहे.यासाठी नागरिकांना बालपणातील त्यांनी खेळलेल्या सर्व खेळाचा आनंद घेता यावा,त्यांच्यात खेळ व व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका विविध सेवाभावी संस्थांच्या मदतीने ” फनस्ट्रीट,” या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. या उपक्रमांर्तगत एकाच ठिकाणी अनेक पारंपारिक व इतर खेळात सहभागी होण्याची संधी उपलब्ध होत असून या फनस्ट्रीटच्या आयोजनामुळे वसई विरार शहरामधील नागरिकांना, विद्यार्थ्यांना त्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी व त्यांच्या मध्ये खेळांची तसेच विविध मैदानी खेळासह इतर खेळांची आवड निर्माण होण्यास मदत होणार आहे. या फनस्ट्रीटमध्ये…
दीपक मोहीते, स्वच्छ भारत अभियानाची ग्रामीण भागात होणार प्रभावी अंमलबजावणी, जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून अनेक गावे स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श होत आहेत. जिल्ह्यातील ४७३ ग्रामपंचायतींमधील ८९८ गावांपैकी ७०३ गावे ओडीएफ प्लस मॉडेल झाली आहेत. १५ व्या वित्त आयोगातील बंधित निधीमधून जास्तीत जास्त निधी स्वच्छतेच्या कामावर खर्च करण्याचे निर्देश पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांना दिले आहेत.तसेच तालुका स्तरीय प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्यात यावेत,तसेच गावापातळीवर स्वच्छतेच्या सुविधा कार्यरत राहण्यासाठी देखाभाल दुरुस्तीकरीता प्राधान्य द्यावे,अन्यथा कारवाई करण्यात येईल.अशी तंबीदेखील यावेळी अधिकारी वर्गाला दिली. स्वच्छ भारत मिशन ( ग्रा.) चा…
अनंत भोईर,पालघर, पालघर येथे ” बेटी बचाओ बेटी पढाओ,” मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न, काल बाल विकास प्रकल्प, पालघर नागरी अंतर्गत अंगणवाडी केंद्र वेवूर येथे ” बेटी बचाओ बेटी पढाओ,” या अभियानाअंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिवेश पष्टे ( अन्न तंत्रज्ञ व आरोग्य सेवक ) उपस्थित होते.प्रवीण मधुकर भावसार, बाल विकास प्रकल्प अधिकारी,यांनी मुलींना मार्गदर्शन केले तर मुख्यसेविका तृप्ती भोये आणि अंगणवाडी सेविका यांनी कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात मोलाची कामगिरी बजावली. उपरोक्त कार्यक्रमात ६५ किशोरवयीन मुली सहभागी झाल्या होत्या.मुलींना शिक्षण, पोषणयुक्त आहार,आरोग्य, स्वच्छता आणि मासिक पाळी व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.…
संजय लांडगे,वाडा, ग्रा.पं.अबिटघर कार्यालयाचा राष्ट्रध्वज फडकणार वारकऱ्याच्या हस्ते, आबिटघर ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी संतोष साठे या सातत्याने नाविन्यपूर्ण तसेच समाजाला दिशा देणाऱ्या गोष्टी आपल्या कार्यक्षेत्रात करत असतात.येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या गावातील सामाजिक, सांस्कृतिक तसेच सांप्रदायिक क्षेत्रात ज्यांनी आपला ठसा उमटवला आहे.अशा व्यक्तींना सामाजिक तसेच सार्वजनिक पटलावर स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने आबिटघर ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी संतोष साठे,उपसरपंच सुप्रिया सुनील पाटील ज्येष्ठ सदस्य भरत गोविंद जाधव व त्यांची संपूर्ण कार्यकारिणी यांनी नेहमीच सकारात्मक निर्णय घेतले आहेत. याच अनुषंगाने आबिटघर गावातील गणपत शिडू पाटील यांच्या शुभ हस्ते येत्या २६ जाने.२०२५ रोजी आबिटघर ग्रामपंचायत कार्यालयावर झेंडा फडकवण्यात येणार आहे.पाटील यांनी आतापर्यंत सांप्रदायिक क्षेत्रात अर्थात वारकरी…
संजय नेवे,विक्रमगड, विक्रमगड येथे मेडिकल असो.तर्फे रक्तदान शिबीर, विक्रमगड महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड डॣगिस्ट असोशियनतर्फे आज राज्यभर तालुक्यात जगन्नाथजी आप्पासाहेब शिंदे यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधत विक्रमगड येथील विठ्ठल मंदिर सभागृहामध्ये भव्य रक्तदानशिबिर संपन्न झाले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून बऱ्याच रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले जव्हार कुटीर रुग्णालय,यांच्या संकलन पेढीने रक्त संकलन केले यावेळी विक्रमगड मेडिकल स्टोअर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश प्रकाश भानुशाली,विजय पाटील सचिव,विक्रमगड मेडिकल स्टोअर्स असोसिएशन तसेच विक्रमगड मेडिकल स्टोअर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य तसेच वाडा,कुडूस अंबाडी येथील मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी प्रफुल पाटील,राजेश चाफेकर, मुकेश पाटील असोसिएशनचे सदस्य,जव्हार,मोखाडा येथील मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी इमरान जुमाने, मिलिंद…
