मनिष धानू,डहाणू
रेल्वेच्या महिला अधिकाऱ्याकडून समाजहिताचा उपक्रम,
गंजाडच्या जिल्हा परिषद शाळेचे अनेक विद्यार्थी आज सहलीसाठी डहाणूला आले होते.सहल म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पर्वणी असते. अशा सहलीमधून त्याना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अन्य विषयाची माहिती मिळावी, असा उद्देश या सहलीमागे असतो.असाच एक सुखद अनुभव गंजाड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना आला.
या सहली दरम्यान विद्यार्थी व शाळेचे शिक्षक डहाणू रोड रेल्वे स्थानकात आले असता येथे असलेल्या एका रेल्वे सुरक्षा बलाच्या महीला अधिकाऱ्याने त्याना शिक्षण,तंत्रज्ञान,मोबाईल वापर व दुष्परिणाम,याविषयी उपयुक्त माहिती देत त्यांचे समुपदेशन केले.अगदी थोड्या वेळात त्यांनी उपयुक्त असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.ही महिला अधिकारी घोलवड रेल्वे स्थानकात जेंव्हा कर्तव्यावर असते,तेंव्हाही त्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करत असतात.त्यामुळे या महिला अधिकाऱ्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थाना अशाप्रकारचे समुपदेशन होण्याची आवश्यकता आहॆ.

