जिल्हास्तरीय पदाधिकारी,अधिकारी आणि कर्मचारी स्पर्धेत तलासरीचे घवघवीत यश,
सुरेश काटे,तलासरी,
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न,
जिल्हास्तरीय पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम उपाध्यक्ष पंकज कोरे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,शिक्षणाधिकारी संगीता भागवत,शिक्षणाधिकारी प्राथमिक सोनाली मातेकर जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वसई,पालघर,डहाणू, विक्रमगड,जव्हार,मोखाडा, वाडा आणि तलासरी,अशा आठ तालुक्यातील पंचायत समितीतील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या.दैनदिन सततच्या कामाचा ताणतणाव कमी व्हावा,यासाठी दरवर्षी पालघर जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी क्रिडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
स्पर्धेत विविध खेळ प्रकारातील क्रिकेट,कब्बडी, खो-खो,लांब उडी,हॉलबोल, धावणे, रिले, बुद्धिबळ, बॅडमिंटन,कॅरम आदी स्पर्धा घेण्यात आल्या.जिल्हास्तरीय पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी क्रीडास्पर्धेत तलासरी तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी भरघोस यश मिळवून सर्वाधिक चषक तलासरी तालुक्याने मिळवले. जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेते,उपविजेते सर्व खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
पुरुष गट :- खो-खो पुरुष उपविजेता कबड्डी पुरुष उपविजेता,क्रिकेट उपविजेता, रिले पुरुष द्वितीय,बुद्धिबळ उपविजेता,बॅडमिंटन पुरुष सिंगल उपविजेता,बॅडमिंटन पुरुष डबल उपविजेता पद पटकावले आहे.
महिला गट:-
खो खो महिला विजेता, कबड्डी महिला उपविजेता,रिले महिला प्रथम,बॅडमिंटन महिला सिंगल उपविजेता,१०० मीटर महिला प्रथम सर्व विजेत्या संघाचे मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गौरवण्यात आले.

