दीपक मोहिते,
पिडीत कुटुंबाचा आक्रोश,
४१ अनधिकृत इमारतीवर कारवाई : पिडीत कुटुंबाचे न्यायासाठी दारोदार भटकंती,
नालासोपारा पूर्व भागातील ४१ अनधिकृत इमारतीमधील विस्थापित ४०० कुटुंबे सध्या हलाखीचे जीवन जगत आहेत.खासदार व आमदारांनी आमची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत आहे.आपली फसगत झाल्याचे कळल्यानंतर ही कुटुंबे न्यायासाठी दारोदार भटकत आहॆ.आज या पिडीत रहिवाशांनी माजी आ.हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन त्याना साकडे घातले.यावेळी आ.ठाकूर यांनी,माझ्याने जे काही करता येईल,ते मी नक्की करीन,माझ्या कारकिर्दीत मी ही बांधकामे तुटू नयेत,यासाठी प्रयत्न केले होते.व ही बांधकामे तुटली नाहीत.पण आता मात्र कारवाई झाली. त्यामुळे हा तिढा आता न्यायालयातच सुटू शकतो.या प्रकरणी ज्यांची तुम्हाला मदत होऊ शकते,ती घ्या,असे सांगितले.
४१ अनधिकृत इमारतीवरील तोडक कारवाईचे पडसाद अद्याप उमटत असून,ही उध्वस्त कुटुंबे न्यायासाठी दारोदार भटकत आहेत.आज त्यांनी वसईचे माजी आ.हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले.आ.ठाकूर यांनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व माझ्याकडून जे काही करता येईल,ते मी नक्कीच करीन.पण आजच्या घडीला तुम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल.त्यासाठी वकिलाशी बोला,असे सांगितले.
या भेटीनंतर पिडीत रहिवाशानी माध्यमासमोर आपल्या जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केल्या.ते म्हणाले,घरे तूटण्यापूर्वी उमेदवारांनी आपली घरे तुटू देणार नाहीत,अशी तोंडभरून आश्वासने दिली होती.तेच उमेदवार आता निवडणूका जिंकल्यानंतर मात्र सदर प्रकरण न्यायालयात असल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही,असे सांगत आपले हात वर करत आहेत.अशाप्रकारे गोरगरीब लोकांची फसवणूक करणाऱ्यांना देव कधीच माफ करणार नाही,असा आक्रोश महिलांनी यावेळी माध्यमाकडे व्यक्त केल्या.

