जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे ” सायबर गुन्हे, ” मार्गदर्शन शिबिराचे आयोजन, मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद,
डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे जनजागृती होणे,अत्यंत गरजेचे आहे.या उद्देशाने आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह,नवीन जव्हार,येथे पोलीस उपनिरीक्षक भुसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ” सायबर गुन्हे आणि त्यापासून बचाव, ” या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात वसतीगृहातील विद्यार्थिनींना सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार,त्यांची ओळख, तसेच अशा गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, ओटीपी शेअरिंगचे धोके, बनावट कॉल्स,ऑनलाइन फसवणूक आणि सायबर सुरक्षेसाठी घ्यावयाच्या आवश्यक उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली.
कार्यक्रम प्रसंगी वसतीगृहाच्या गृहपाल पुष्पा विश्वनाथ जाधव,तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.पोलीस कॉन्स्टेबल कैलास राठोड आणि पोलीस शिपाई बुधर मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या शंकाकुशंकाचे निरसन केले.
विद्यार्थिनींनी या मार्गदर्शन सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व भविष्यात सायबर सुरक्षेशी संबंधित अधिक माहिती घेण्याची इच्छा व्यक्त केली.पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण झाली असून,अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे सायबर गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

