सुरेश काटे,तलासरी,
काजळी ग्रामदान मंडळावर माकपाचे वर्चस्व,
तालुक्यातील काजळी ग्रामदान मंडळाच्या अध्यक्ष तसेच उपाध्यक्षपदासाठी निवडणुका नूकत्याच पार पडल्या.या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विजयी होऊन ग्रामदान मंडळावर पुन्हा एकदा लालबावटा फडकला आहे.
ग्रामदान मंडळ कार्यालय काजळे येथे नायब तहसीलदार मुकणे यांच्या निरीक्षणाखाली झालेल्या निवडणुकीत काजळी ग्रामदान मंडळावर अध्यक्षपदी ( सरपंच ) शंकर जलाराम वरठा,उपाध्यक्षपदी ( उप सरपंच ) जयेश रडका कोद्ये हे दोघे
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार निवडून आले. ग्रामदान मंडळ ताब्यात घेण्यासाठी विरोधकांनी पुर्ण ताकत लावली होती.पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य अनिल झिरवा यांनी आणि कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने लढवल्यामुळे तसेच लोकांनी माकपावर विश्वास ठेवून जनतेने एकदा पुन्हा लाल बावटा फडकवला.त्याबद्दल कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.यापुढे जोमाने विकासकामे करून लोकांची समस्या सोडवणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष शंकर वरठा यांनी सांगितले आहे. यावेळी लक्ष्मण डोंभरे, राजेश खरपडे यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या आहेत.

