संजय लांडगे,वाडा,
जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेत सोनशिव शाळा ठरली अव्वल,
पालघर जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेतील कबड्डी या क्रिडाप्रकारात वाडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सोनशिव ही शाळा प्रथम क्रमांकाने विजयी झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी वाडा तालुका गटशिक्षणाधिकारी जयवंत कामडी,बीटविस्तार अधिकारी सातपुते,केंद्रप्रमुख सुरेश ढवळे यांच्या हस्ते विद्यार्थी व शिक्षक यांचे जिल्हा परिषद शाळा सोनशिव येथे अभिनंदन व कौतूक करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक वसंत दळवी क्रिडा शिक्षक, बबन ठाकरे, प्रशिक्षक विजय ठाकरे, प्रविण अधिकारी, मार्गदर्शक प्रविण गायकर, प्रगती भोईर,आरती घाणेकर, अध्यक्ष शशिकांत डोंबर, एस.एम.सी.सदस्य सोनशिव ग्रामस्थ,मंडळ महिला मंडळ, तरुण मंडळ आदी उपस्थितीत उपस्थित होते.

