- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- पालघर जिल्ह्यावर अनेक प्रकल्प लादून सरकार स्थानिकांना देशोधडीला लावत आहे,
- २०३४ पर्यंत भाजपचा पराभव करणे अशक्य,
- परिवहन सेवेचा संप ; ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांचे प्रचंड हाल,
- वर्गात सर्वात सुंदर शिक्षक असतो,
- वसई विरार मनपा क्षेत्रात दीड दिवसाच्या गणपतीच्या मूर्तीचे उत्साहात विसर्जन,
- शेजारच्या देशात मोठ्या घडामोडी ; एक व दोन नव्हे तर सात राजकीय नेत्यांना मृत्यूदंड,
- ” या चिमण्यानो, परत फिरा रे, “
- पालघर हॉस्पिटल मारहाण प्रकरण ; २१ आरोपीना पोलीस कोठडी,
Author: दीपक मोहिते
सुरेश काटे,तलासरी, उधवा ग्रामस्थांनी स्वखर्चाने बनवला रस्ता, उधवा केवडीपाडा येथील रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती,या रस्त्यावरून वाहन चालवणे व साधे चालणेही अवघड झाले होते. हा रस्ता दुरुस्त करण्याबाबत उधवा केवडीपाडा येथील ग्रामस्थानी उधवा ग्रामपंचायत, जिल्हा परिषद बांधकाम विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग यांना अनेक विनंती अर्ज केले पण करतो यापलीकडे कोणतेही उत्तर मिळत नसल्याने अखेर केवडी पाड्यातील ग्रामस्थानी स्वखर्चाने आणि श्रमदानाने केवडीपाड्यात येणारा रस्ता बनवला. उधवा केवडीपाडा येथील कच्चा अत्यंत खराब झाला होता,रस्त्यात मोठे खड्डे पडले होते,खड्ड्यांमुळे वाहनाचे मोठे नुकसान होत होते, पावसाळ्यात चालणेही अवघड झाले होते,हा रस्ता दुरुस्त करावा म्हणून गावातील तरुण वर्ग ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांना वारंवार भेटून विनंती अर्ज…
वसंत भोईर,वाडा अवकाळी पावसामुळे वाड्यातील भातशेतीची दैना, तालुक्यात भात कापणी जोमात सुरू असून,अनेक शेतकऱ्यांनी भात कापून शेतात ठेवला आहे.पण सततच्या पावसामुळे कापलेले पीक ओले झाले असून, मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील भात पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. संध्याकाळच्या सुमारास पडणाऱ्या या अवकाळी पावसाने भातपिकाचे अतोनात नुकसान होत आहे. तालुक्यात सध्या भातकापणी वेगाने सुरू असून,अनेक शेतकऱ्यांनी भात कापून शेतात ठेवला आहे. पण सततच्या पावसामुळे कापलेले पीक ओले झाले आहे.मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील भातपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. संध्याकाळच्या सुमारास पडणाऱ्या पावसामुळे भाताचे पीक सुकत नाही आणि ते आता वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. भिजलेल्या भातपिकांचे कृषी विभागाने लवकरात…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आयाराम गयारामाचे आवागमन तूर्तास थंडावले आहे… गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये सुरू झालेले इनकमिंग सध्या काही अंशी थंडावले आहे.ज्या पद्धतीने इनकमिंग सुरू झाले होते,त्यामुळे जुन्याजाणते भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे,परिणामी ही मोहीम सध्या आवरती घेण्यात आल्याचे समजते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ही प्रक्रिया सुरू झाली होती.त्यास बऱ्यापैकी प्रतिसाद मिळू लागला होता.पण,नव्याने दाखल झालेल्या आयारामामुळे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला निवडणुकीत उमेदवारी मिळेल की नाही,याविषयी भिती निर्माण झाली आहे.बाहेरून येणाऱ्यांचा ओघ असाच सुरू राहीला तर आपले राजकीय भवितव्य अंधारात सापडेल,अशा विवंचनेत अनेक इच्छुक उमेदवार सापडले आहेत.निवडणुकीच्या तोंडावर जुने – नवे असा कलगीतुरा रंगण्याची…
दीपक मोहिते, ” आम्हा मतदारांची सनद,” १ ) शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळा,प्राथमिक आरोग्य केंद्रे व रुग्णालये महानगरपालिकेकडे कधी हस्तांतरीत होणार ? हस्तातरण प्रक्रियेत कोणत्या अडचणी आहेत. २ ) महानगरपालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्त्याची डागडुजी,दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीचा मुहूर्त कधी ? वर्षानुवर्षे अशीच लूट होत राहणार का ? ३ ) शहरातील करदात्यांना दर्जेदार आरोग्य व वैद्यकीय सेवा कधी उपलब्ध होणार ? ” आपला दवाखाना,” योजनेची सद्यस्थिती पाहता,ही व्यवस्था फार काळ चालणार नाही,असे करदात्यांना वाटते ? त्यामध्ये किती तथ्य आहे ? ४ ) शहरातील पाच उड्डाणपूल व रिंगरुट रखडण्यामागची नक्की कारणे काय होती ? महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणाने त्यासाठी आर्थिक तरतूद करण्याचे मान्य केले…
दीपक मोहिते, स्था.स्व.सं.च्या निवडणुका पुढील महिन्यात तरी होतील का ? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात पुन्हा एकदा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.या निवडणुकीच्या प्रचारात कोणकोणते मुद्दे चर्चेत असतील,याविषयी काही प्रमुख राजकीय पक्ष अंदाज घेत आहेत.विकासाचे स्थानिक प्रश्न,लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार व लाडक्या बहिणीवर कमी झालेला योजनेचा प्रभाव,” आनंदाचा शिधा,” योजनेचा झालेला बट्ट्याबोळ,उद्धव व राज ठाकरे बंधूंचे मनोमिलन,हे सारे मुद्दे प्रचारात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच या निवडणुका वेळेवर होतील का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व निवडणुका पुढील महिन्यात होतील,असा अंदाज व्यक्त होत असताना निवडणूक आयोगाकडून मतदारयाद्याचे पुनर्निरिक्षण करण्याची झालेली घोषणा व राज्य सरकारने या निवडणुका काही काळ पुढे…
वसंत भोईर, कातकरी मुलीची घरकाम व मच्छीच्या कामासाठी पिळवणूक, तालुक्यातील गौरापुर कातकरी वाडी येथील १० वर्षे शालेय वयोगटातील आदिवासी कातकरी मुलीला उत्तन येथे मच्छी वाळवणे आणि घरगुती कामे करण्यासाठी जबरदस्तीने बालमजूर म्हणून राबवण्यात आले,अशी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. मुलीच्या आईने तक्रारीत नमूद केले आहे की,आरोपी ज्युलीयाना लेजली पाटील ( रा. उत्तन चौक,भायंदर वेस्ट, ठाणे) हिने मुलीला घरकाम व मच्छी कामासाठी जोरजबरदस्तीने घेऊन गेली व काम न केल्यास शिवीगाळ व मारहाण केली.गेल्या वर्षी गणपती सणापासून ते जून २०२५ पर्यंत मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध घरकामासाठी वापरले गेले,तसेच आगाऊ बयाणा रक्कम कुटूंबियांना देण्यात आली.काल…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन, ” राज्याचा विभागीय असमतोल दूर करण्याची गरज…. औद्योगिक,शैक्षणिक,राजकीय व सामाजिकदृष्टया प्रगत राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रात घसरण का होत आहे ? हा चिंतेचा विषय असून त्याचे पडसाद आता उमटु लागले आहेत.दरडोई आर्थिक उत्पन्न वाढले असले तरी महागाईच्या वणव्यात सर्वसामान्यजन होरपळुन निघत आहे.” शिक्षणाचा अधिकार,” कायदा मंजूर होऊनही ग्रामीण भागात साक्षरतेचे प्रमाण वाढू शकले नाही,आरोग्य व वैद्यकीय सोयी – सुविधा क्षेत्रातही गेल्या ७५ वर्षात भरीव काम होऊ शकले नाही.वीजनिर्मिती,उद्योगधंदे,कृषीक्षेत्र, रोजगारनिर्मिती,या प्रमुख ज्वलंत विषयाकडे एकाही सरकारने जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही.सन २००५ पर्यंत वीजनिर्मितीचा एकही प्रकल्प मार्गी लागू शकला नाही.एनरॉन वीज प्रकल्पाचे काय झाले ? याविषयी न…
दीपक मोहिते, जेव्हा रस्त्यावरील खड्डे बोलू लागतात…. वसई तालुक्यातील रस्त्याची दुर्दशा व भलेमोठे खड्डे,यावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे.भाजप व बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांची उणीदुणी काढत उरावर बसत आहेत,त्यामुळे वसई तालुक्यातील राजकारण सध्या ढवळून निघाले आहे.मात्र रस्त्यावरील हे खड्डे सुद्धा आता बोलायला लागले आहेत.” आम्हा खड्ड्याचा यामध्ये दोष तो काय ? आम्हाला कोणी जन्माला घातले ? आमचे डांबर कोणी चोरले ? ” खड्डेमय रस्ते,” असे नामकरण कोणी केले ? आमच्या जखमांवर पॅचवर्क करण्याच्या नावावर ओरबाडून खाणारे कोण ? असे एक ना अनेक प्रश्न हे खड्डे आता विचारू लागले आहेत.त्या बिचाऱ्या खड्ड्याना त्यांच्या या साऱ्या प्रश्नांची उत्तरे कधीच मिळू शकणार…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” बिहारचा निकाल रालोआच्या विरोधात गेल्यास राज्यातील स्था.स्व.संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडतील.. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका,या डिसें. महिन्यात पार पाडण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे,त्यादृष्टीने आयोग कामाला लागला आहे.या निवडणूक होण्याअगोदर बहुचर्चित बिहार राज्याच्या निवडणुका होणार आहेत.या निवडणूक ६ व ११ नोव्हे.रोजी होत आहेत.त्याची मतमोजणी १४ नोव्हे.रोजी होणार आहे.बिहारच्या या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होत असून या निवडणुकीचे निकाल दूरगामी परिणाम करणारे असतील,त्यामुळे केंद्र सरकार काहीतरी खुसपट काढून आपल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करेल,अशी शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना ( उबाठा ) व मनसे यांचे मनोमिलन व अन्य विरोधी पक्षाची झालेली एकजूट,अशा…
दिपक मोहिते, एका होतकरू तरुणाचे अभूतपूर्व धाडस, आज दिपावलीच्या शुभमुहूर्तावर वसईतील एका होतकरू तरुणाचे समाज माध्यम क्षेत्रात पदार्पण होत आहे.त्याच्या या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच…अलीकडच्या काळात माध्यम क्षेत्राला अवकळा आली असताना,या तरुणाने या फंदात का पडावे ? असा प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाला व त्याला मी यासंदर्भात काही प्रश्न विचारले,त्यांनी जे काही उत्तर दिले,त्यामुळे मी आश्चर्यचकित झालो.तो म्हणाला,नव्याने सुरू होणारे माझे युट्युब चॅनेल हे कोणाचे बटीक म्हणून कधीही काम करणार नाही.माझे चॅनेल,हे सर्वसामान्यजनांच्या दैनंदिन जीवनात भेडसावणारे प्रश्न,समस्या व अडचणी,यावर प्रकाशझोत टाकण्यासाठी सक्रिय असेल.कोणाच्या सांगण्यावरून बदनामी करणे,किंवा विरोधात चालवणे,हे मला अभिप्रेत नाही.परिसर विकास,सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनातील प्रश्न व विश्वासार्हता,या अशा…
