- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- पालघर जिल्ह्यावर अनेक प्रकल्प लादून सरकार स्थानिकांना देशोधडीला लावत आहे,
- २०३४ पर्यंत भाजपचा पराभव करणे अशक्य,
- परिवहन सेवेचा संप ; ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांचे प्रचंड हाल,
- वर्गात सर्वात सुंदर शिक्षक असतो,
- वसई विरार मनपा क्षेत्रात दीड दिवसाच्या गणपतीच्या मूर्तीचे उत्साहात विसर्जन,
- शेजारच्या देशात मोठ्या घडामोडी ; एक व दोन नव्हे तर सात राजकीय नेत्यांना मृत्यूदंड,
- ” या चिमण्यानो, परत फिरा रे, “
- पालघर हॉस्पिटल मारहाण प्रकरण ; २१ आरोपीना पोलीस कोठडी,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” याला म्हणतात, ” परफेक्ट टायमिंग, ” दोन दिवसांपूर्वी बहुजन विकास आघाडीचे क्रमांक २ चे नेते व माजी महापौर राजीव पाटील यांनी आपल्या काही समर्थक उमेदवारांच्या भेटीगाठी घेतल्या.त्यांच्या या भेटीनंतर सर्वत्र वादळ उठले.नालासोपारा शहरातील त्यांचे व्यवसायिक भागीदार निलेश चौधरी यांची त्यांनी आवर्जून भेट घेतली.या भेटीत त्यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार ” धनंजय गावडेला पाडा,” असे आवाहन केले.धनंजय गावडे हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.एकेकाळी माजी आ.हितेंद्र ठाकूर यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे गावडे सध्या ठाकुरांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत.राजू पाटील यांचे सहकारी निलेश चौधरी व माजी आ.हितेंद्र ठाकूर यांचे सध्याचे मित्र धनंजय…
दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, असंख्य गुन्हे असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,तब्बल १५६ उमेदवार कोट्याधीश, वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक जागांवर दिग्गज उमेदवारांच्या लढती होत आहेत.हे सर्व उमेदवार पूर्ण ताकदीनिशी रणांगणात उतरले आहेत.पण मतदार मात्र मनात काय चालले आहे,याचा थांगपत्ता काही लागू देत नाहीत.दरम्यान या दिग्गज उमेदवारांमध्ये हल्ले – प्रतिहल्याचा सिलसिला आता जोरात सुरू झाला आहे.या निवडणुकीत मतदार कोणाच्या पारड्यात आपली मते टाकतात,हे १६ जाने.रोजी होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.प्रचार संपायला आता केवळ ७२ तास उरले आहेत.या तीन दिवसात उमेदवाराना वेगवान असा प्रचार करावा लागणार आहे.मतदानाच्या एक दिवस अगोदरच्या रात्री ” रात्रीचा खेळ चाले,” या नाट्याचा प्रयोग होण्याची शक्यता गृहीत धरून…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” उखडून फेकून द्या,” ; भूतकाळात जरा डोकावून बघा वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचाराच्या अंतिम टप्यात आता शह-काटशह,एकमेकांवर चिखलफेक,करणे,बॅनर्स फाडणे,असे प्रकार सुरू झाले आहेत.अशावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नालासोपारा येथे झालेल्या जाहीर सभेत ” येथील सत्ताधाऱ्यांना उखडून फेकून द्या,” अशी खालच्या पातळीवर उतरून टीका केली.हा प्रकार आगीत तेल ओतण्यासारखाच आहे.वास्तविक कार्यकर्त्याना चथावणी देणाऱ्या भाषेचा वापर करता कामा नये होता.पण,त्यांनी ती तशी केली.विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी विरोधकांना घेरणे,हे साहजिक होते,पण अशा प्रकारची भाषा वापरणे मात्र योग्य नव्हते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात आपण या भागात केलेल्या विकासकामांची जंत्रीच वाचून दाखवली.गेली पंधरा वर्षे तुमचा खासदार,पालकमंत्री देखील…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” खरी लढत भाजप व बहुजन विकास आघाडीमध्येच… वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने “आम्हाला देण्यात आलेल्या सात जागांवर आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यामुळे युतीचा धर्म भाजपने पाळला नाही,असा आरोप शिंदे गटाचे आ.विलास तरे यांनी वसई येथे केला.त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिंदे गटाने असा आरोप करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसनेही ( अजित पवार ) असाच आरोप केला होता.या सर्व घडामोडीमुळे वसई विरार मनपा निवडणुकीत महायुती मोडीत निघाल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.भाजपने या महानगरपालिकेत ८५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.त्यासाठी आपल्या सोबत असलेल्या घटक पक्षांना त्यांनी योग्य प्रमाणात जागा दिल्या नाही.जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ताकद नसताना पाठिंबा देण्याचे नाट्य… वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) या दोघांनी अनुक्रमे बहुजन विकास आघाडी व भाजपच्या बंडखोर उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.त्यांच्या या कृतीकडे वसई- विरारकर मतदार एक ” अफलातून विनोद,” दृष्टीने पाहत आहेत.वसई तालुक्यात या दोन्ही पक्षाची ताकद असून नसल्यासारखी आहे,या दोन्ही पक्षाना साध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवणे आजवर कधीच शक्य झाले नाही.अशीच परिस्थिती संपूर्ण पालघर जिल्ह्यात देखील पाहायला मिळते. अशा परिस्थितीमध्ये या दोन्ही पक्षाच्या जिल्हाध्यक्षानी काल पक्षाने बहुजन विकास आघाडी व भाजपच्या बंडखोर उमेदवारांना पाठिंबा दिल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले.त्यामुळे येथील मतदार…
दीपक मोहिते, सत्तेत कोणीही या,पण आम्ही दिलेल्या मताशी प्रतारणा करू नका,भ्रष्ट व अनागोंदी कारभार रोखा, निवडणुकीचे सारे सोपस्कार आता जवळपास संपल्यात जमा आहेत. उमेदवार व मतदारांना मतदान व मतमोजणी होणाऱ्या दोन दिवसाची प्रतिक्षा आहे.गेल्या तीन दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच पक्षाची उमेदवारी न मिळालेले नाराज उमेदवार आता प्रचाराला लागले आहेत.प्रचार सुरू झाला असला तरी राजकीय पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते हे रिंगणात उतरलेल्या बंडखोरांची समजूत काढण्यासाठी सक्रिय झाले आहेत.त्यांना या कामात किती यश येते हे,येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे. मतविभागणी टाळण्यासाठी हे सारे काही करावे लागत असते.ही प्रक्रिया गेली अनेक वर्षे पाहायला मिळत आहे.” आम्हाला उमेदवारी का नाही ? आयुष्यभर…
वसई विरार मनपा निवडणूक ; काँग्रेस व मनसेने आपल्या निवडणूक चिन्हाना श्रद्धांजली वाहण्याची गरज नव्हती…
दीपक मोहिते, कुरुक्षेत्र, वसई विरार मनपा निवडणूक ; काँग्रेस व मनसेने आपल्या निवडणूक चिन्हाना श्रद्धांजली वाहण्याची गरज नव्हती… निवडणुकीचे सारे सोपस्कार आता जवळपास पूर्ण झाले असून उद्यापासून प्रचाराचे ढोल ताशे वाजू लागणार आहेत.भाजप – शिंदे गट या दोघांची अभेद्य युती विरोधात विरोधकांची विस्कळीत आघाडी,अशी सरळ लढत होत आहे.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट ) घड्याळ मात्र सुरूच झाले नाही.त्यांची टिकटिक वसईच्या मतदारांच्या कानावर पडण्या अगोदरच भाजपने ते बंद पाडले. या निवडणुकीत शिंदे गटाने समंजसपणा दाखवला नसता तर त्यांचाही राष्ट्रवादी झाला असता.पण एकनाथ शिंदे यांचे वास्तवाचे भान ठेवून वागण्याचे कसब नक्कीच कौतुकास्पद असेच आहे. त्यामुळे या निवडणुकीत या दोघांनी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” निवडणुकीचे तिकीट,आता एटीम कार्ड बनले आहे… दोन दिवसांपूर्वी मांडवातील गोंधळ संपला आहे.गेले सात दिवस प्रतिक्षेत असलेल्या नवरा व नवरी मुलींचा संसार आता लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.कुटुंबातील कर्त्या धर्त्यांनी एकमेकांना पाहण्याच्या कार्यक्रमात नवरा -नवरीला प्रचंड मनस्ताप दिला,त्यामुळे थकले भागलेले हे दोघे आता संसाराची जुळवाजुळव करण्यामध्ये गुंतले आहेत.त्यांचा हा संसार १६ जाने.नंतर रुळावर येणार आहे.पण येणारा १५ दिवसाचा हा काळ,त्यांच्यासाठी अत्यंत खडतर असाच आहे.१५ जाने.रोजी होणाऱ्या अग्निदिव्यातून गेल्यानंतर मात्र त्यांना सलग पाच वर्षे रिसेप्शन साजरा करायला मिळणार आहे.या काळात त्यांना केवळ आहेराची पाकिटे घेत राहायचे आहे.त्यामुळे सध्याचा त्रास सहन करण्याची त्यांची तयारी आहे.हा त्रास केवळ एक महिन्यापूरता…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” राजकारणात कधीही काहीही होऊ शकते,” वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ११५ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज ३.०० वाजता थांबणार आहे.आज शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी महानगरपालिका परिसराला छावणीचे स्वरूप येणार आहे.मित्रपक्षाशी बोलणी व बंडखोरीची भिती,अशा दोन कारणामुळे उमेदवारी जाहीर करण्यासंदर्भात प्रत्येक राजकीय पक्षाने विलंब लावला.त्यामुळे आज उमेदवारांची चांगलीच धावपळ होणार आहे.तसेच ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही चांगलीच दमछाक होणार आहे. अशी परिस्थिती असतानाही काही उमेदवारांची नांवे जाहीर झाली आहेत.पण,ज्यांना उमेदवारी मिळाली नाही,त्यांनी आता आपली वाघनखे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.तर काही राजकीय पक्ष प्रतिस्पर्धी पक्षातील नाराजांच्या नाराजीला प्राणवायू देत आहेत.निवडणुकीच्या…
दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, वसई विरार मनपा निवडणूक ; पराकोटीचा संघर्ष व हाणामाऱ्या पाहायला मिळणार… वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपा क्षेत्राच्या चार शहरात राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे.एकमेकांवर होत असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाला चांगलाच वेग आला आहे.त्यासाठी सोशल मीडियाचा बेसुमार वापर सुरू झाला आहे.प्रचाराची दिशा पाहता,या निवडणुकीत प्रचाराचा भर हा ” सकारात्मक दृष्टिकोना,” वर आधारित नसणार,हे स्पष्ट झाले आहे.या निवडणुकीत युट्युब चॅनलला सुगीचे येणार,हे स्पष्ट होत आहे.” स्वस्त व मस्त,” अशा चौकटीत होणाऱ्या त्यांच्या प्रचाराला उमेदवारांची पहिली पसंती मिळू लागली आहे.त्यामुळे संभाव्य उमेदवारांनी या युट्युबर्सना जवळ करण्याचे धोरण अवलंबले आहे.फेसबुक,व्हाट्सअप व इंस्टाग्रामवर उमेदवारांच्या मुलाखतीचा जो सिलसिला सुरू झाला…
