Author: दीपक मोहिते

वसंत भोईर,वाडा, वाड्यात रक्तदान शिबिराचे आयोजन, जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून वाडा तालुक्यातील ई.पी.एल. कंपनीतर्फेरक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वाडा तालुक्यातील ई.पी. एल.कंपनीने जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून वाडा युनिट येथे कै. वामनराव ओक रक्तपेढी ठाणे यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावर्षी रक्तदान दिनाची संकल्पना होती ” रक्त द्या, एकत्र येऊन जीव वाचवा “. उन्हाळ्याचे तीव्र तापमान आणि मान्सूनच्या प्रारंभामुळे रक्तदात्यांची संख्या कमी असते,अशा परिस्थितीतही ई पी.एल.कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन ४२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी दाखवली. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी ई.पी.एल.कंपनी व्यवस्थापन,कामगार व वामनराव ओक रक्तपेढीचे मुख्य प्रशासकीय अधिकारी सुरेंद्र…

Read More

दीपक मोहिते, मोबाईलचा वापर मर्यादेतच व्हायला हवा…. प्रसिद्धी माध्यमाच्या जगात मोबाईल व संगणक,या दोन इलेक्ट्रॉनिक वस्तुंना आता अनन्यसाधारण महत्व आले आहे.ते जगभरातील माध्यमे अत्यंत प्रभावीपणे वापरत आहेत.व्हाटसअप व फेसबुक यानी तर जग आपल्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे.या माध्यमामुळे पत्र व तार हा प्रकारच इतिहासात जमा झाला आहे.जगभरात कुठे काय घडले,हे क्षणार्धात आपण घरी बसून पाहू शकतो,इतकी ही माध्यमे प्रभावी ठरली आहेत.त्यामुळे लहान मुले,तरुण-तरुणी,महिला व आबालवृद्ध मंडळी त्याच्या पूर्णपणे आधीन झाले आहेत.एखाद्या वेळी इंटरनेट बंद पडले की आपण अक्षरशः वेडेपीसे होतो. बदलत्या आपण या सर्व माध्यमाच्या इतक्या आहारी गेलो आहोत कि त्यामधून बाहेर पडणे,आता कोणालाही शक्य नाही.असं म्हणतात कि विकास कधीही…

Read More

दीपक मोहिते, ” निवडणूक पर्व,” पालघर जिल्हा परिषद / ८ पंचायत समित्याच्या निवडणुकामध्ये महायुती बाजी मारणार… स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुकामध्ये महानगरपालिका निवडणुकासोबत इतर संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.ग्रामीण भागातील जिल्हा परिषदा,पंचायत समित्या, नगरपरिषदा,नगरपंचायती व सहकारी संस्थाचा त्यामध्ये समावेश असेल.या सर्व संस्था आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष प्रयत्नशील असतो.त्यामुळे सारेच पक्ष सध्या कामाला लागले आहेत.या सर्व निवडणुका एकाचवेळी घेणे शक्य झाले नाही तर निवडणूक आयोग महानगरपालिका निवडणुका पार पडल्या की निवडणूक आयोग जिल्हा परिषद व पंचायत समित्याच्या निवडणुका जाहीर करेल, अशी शक्यता आहे.जिल्हा परिषदा व पंचायत समित्याच्या निवडणुका मागाहून होणे,सत्ताधारी पक्षाना सोयीचे ठरणार नाही. त्यामुळे त्या महानगरपालिका निवडणुकासोबतच होतील,…

Read More

सुनंदन गोखले,नाशिक रोड नाशिक महानगरपालिका निवडणूक ; प्रभाग रचनेच्या कामावर राजकीय पक्षाचा दबाव असण्याची शक्यता, केंद्रीय निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात राजकीय हालचालीना वेग आला आहे. नाशिकमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण हळूहळू तापू लागले आहे.नाशिकच्या महायुतीमध्ये अंतर्गत बऱ्याच घडामोडी घडू लागल्या आहेत.तर महाविकास आघाडीची घडी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. महापालिकेची प्रभागरचना आपल्याला अनुकूल असावी, यासाठी शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) व भाजप या दोघांकडून छुपे प्रयत्न सुरू झाले आहेत.प्रभागरचना जर अनुकूल असेल तर महानगरपालिकेत आपला विजय सोपा असेल,अशा निर्णयाप्रत हे दोन्ही पक्ष आले आहेत.त्यामुळे प्रशासनाने कितीही निरपेक्षपणे काम करण्याचा प्रयत्न केला तरी प्रभाग…

Read More

नदीम शेख,पालघर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लोकमान्य नगर,मोहपाडा येथील नागरिक त्रस्त, पालघर नगरपरिषद हद्दीतील लोकमान्य नगर परिसरातील मोहपाडा रोड,मुख्य रस्ता,सध्या खोदलेला असून तो अनेक दिवसांपासून तसाच अर्धवट अवस्थेत सोडण्यात आला आहे.त्यामुळे या भागातील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून रुग्णवाहिका,अग्निशमन दल यांसारख्या आपत्कालीन वाहने येऊ-जाऊ शकत नाहीत.अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना किंवा वैद्यकीय गरज उद्भवली,तर मदत पोहोचवणं कठीण होते. विशेष म्हणजे,या रस्त्याच्या लागून दोन शाळा आहेत.लहान मुलांना दररोज याच मार्गाने शाळेत ये-जा करावी लागते. स्थानिक नागरिक,दुकानदार आणि वयोवृद्धांना देखील प्रवास करताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.काहींनी पर्यायी मार्ग वापरण्याचा प्रयत्न केला,पण तोही पुरेसा सुरक्षित नाही. प्रशासनाने याप्रकरणी तातडीने लक्ष…

Read More

सचिन पाटील,विरार गणेशोत्सव संदर्भात मुर्तीकारांसोबत महानगरपालिका प्रशासनाची बैठक संपन्न, आयुक्त तथा प्रशासकअनिलकुमार पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात महापालिका क्षेत्रातील मूर्तिकार व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी यांचेसोबत गणेशोत्सव संदर्भात बैठक पार पडली. बैठकीच्या सुरुवातीस उपायुक्त अर्चना दिवे यांनी महानगरपालिकेने गेल्या वर्षी गणेशोत्सवासाठी,गणेशमूर्ती विसर्जनासाठी केलेल्या नियोजनाची तसेच एकूण झालेल्या विसर्जनाबाबतची माहिती उपस्थितांना देण्यात आली.आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी गणेशमूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेने एकूण १०५ कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती.गेल्या वर्षी म्हणजेच सन २०२४ मध्ये गणेशोत्सव काळात महानगरपालिका क्षेत्रात एकूण ३३ हजार ७०१ मूर्तींचे विसर्जन झाले होते,त्यापैकी एकूण १९ हजार ८५३ मूर्तींचे विसर्जन हे महानगरपालिकेने निर्मिती केलेल्या कृत्रिम तलाव,फिरते…

Read More

जव्हार प्रतिनिधी, नाचणी पिकांचे बियाणे मिनीकीटचे आ.हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते वाटप, राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य उपअभियान ” श्री अन्न” अंतर्गत नाचणी पिकांचे मिनीकीट बियाणे वाटप कार्यक्रम मौजे देहरे येथे पार पडला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आ.हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांना बियाण्यांचे व पंजाबराव देशमुख नैसर्गिक सेंद्रिय शेती मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना प्लास्टिक ड्रमचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी जव्हार जयराम आढळ,मंडळ कृषी अधिकारी, अशोक बागुल,उप कृषी अधिकारी अनिल डाबेराव, सहाय्यक कृषी अधिकारी भरत कोरडे तसेच राधाकृष्ण महिला बचतगटाच्या प्रमुख आदिवासी समाजसेविका मीरा महाले,इतर महिला सदस्या व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने…

Read More

वसंत भोईर,वाडा भारतीय युवकाने घडवला परकिय भूमीवर इतिहास ; तब्बल तीस तास धावला, तालुक्यातील नेहरोली येथील रहिवासी असलेला कुणाल विजयकुमार पाटील या जिद्दी तरुणाने नुकतीच इटली या देशामध्ये डोलोमाईट एक्स्टरीम ट्रेल रन ही जगातील प्रतिष्ठेची मानली जाणारी स्पर्धा नुकतीच पार पडली.या स्पर्धेत तो तब्बल तीस तास धावून आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले. ही स्पर्धा इटलीमधील जगप्रसिद्ध डोलोमाईट डोंगररांगांतून धावण्याची असते.अंतर असते १०३ किलोमीटर,ही स्पर्धा केवळ धावण्याची नसून,डोंगर रांगांतून चढउतार करत हे अंतर पूर्ण करायची असते. अत्यंत कठीण डोंगर पायवाटा,नद्या,नाले,ओढे, जंगले पार करत धावावे लागते.काही ठिकाणी उतार एव्हढे तीव्र होते की आयोजकांनी खडकांना केबल बांधल्या होत्या,त्यापकडून काळजीपूर्वक खाली उतरावे लागते.पाय घसरला…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे अंगणवाड्यांमध्ये भव्य खेळ मेळावे  संपन्न, जागतिक खेळ दिनाचे औचित्य साधून जव्हार तालुक्यातील विविध गावांतील अंगणवाड्यांमध्ये खेळ मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले hote.जे.एस.डब्ल्यू. आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत हे कार्यक्रम साजरे झाले. या उपक्रमात पारंपरिक आणि आधुनिक खेळांचे सुंदर मिश्रण असलेले विविध स्पर्धात्मक आणि मनोरंजनात्मक खेळ खेळण्यात आले.मोठ्या गटांचे खेळ,बैठक खेळ,काल्पनिक आणि संगीतावर आधारित खेळ,शारीरिक खेळ तसेच मुक्तपणे खेळता येणारे अनेक प्रकार अनुभवायला मिळाले. खो-खो,कबड्डी,लंगडी, रस्सीखेच,सायकल शर्यत, मटकाफोड,लिंबू-चमचा शर्यत, धावण्याच्या शर्यती,अशा पारंपरिक खेळांनी वातावरण आनंदमय झाले होते. बालकांच्या कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या कविताचे सादरीकरण,गोष्टींचे सादरीकरण व भूमिकानिवेशन यांचाही समावेश यामध्ये करण्यात आला होता.…

Read More

दीपक मोहिते, समुद्रधन वाचवणे, ही काळाची गरज, दरवर्षी पावसाळ्यात सलग दोन महिने खोल समुद्रातील मासेमारी बंद ठेवण्यात येत असते.यंदाही १ जूनपासून ही बंदी लागू झाली असून ती सुमारे दोन महिने बंद राहणार आहे.हा काळ माश्याचा प्रजननाचा असल्यामुळे सरकार ही बंदी लादत असते.या काळात झालेली मासेमारी आपल्या व्यवसायावर गंडांतर आणते,हे लक्षात आल्यानंतर राज्यातील तमाम मच्छिमार संघटनांनी सरकारच्या या निर्णयाला सर्वानुमते मंजुरी दिली.त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून ही बंदी अंमलात येत आहे.या काळात मच्छिमार बोटी समुद्रकिनारी निवांत विश्रांती घेत असतात.प्रजनन काळात होणाऱ्या मासेमारीमध्ये माश्यांच्या छोट्या पिल्लांची कत्तल होत असते तसेच माश्याच्या अंड्याचाही नाश होत असतो व त्याचा परिणाम मत्स्य उत्पादन वाढीवर जाणवतो. गेल्या…

Read More