वसंत भोईर,वाडा,
वाड्यात रक्तदान शिबिराचे आयोजन,
जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून वाडा तालुक्यातील ई.पी.एल. कंपनीतर्फेरक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
वाडा तालुक्यातील ई.पी. एल.कंपनीने जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून वाडा युनिट येथे कै. वामनराव ओक रक्तपेढी ठाणे यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावर्षी रक्तदान दिनाची संकल्पना होती ” रक्त द्या, एकत्र येऊन जीव वाचवा “. उन्हाळ्याचे तीव्र तापमान आणि मान्सूनच्या प्रारंभामुळे रक्तदात्यांची संख्या कमी असते,अशा परिस्थितीतही ई पी.एल.कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन ४२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी दाखवली.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी ई.पी.एल.कंपनी व्यवस्थापन,कामगार व वामनराव ओक रक्तपेढीचे मुख्य प्रशासकीय अधिकारी सुरेंद्र बेलवलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

