दीपक मोहिते,
यशस्वी जीवनाचे रहस्य,
आपले जीवन यशस्वी करणे म्हणजे फक्त पैसा कमवणे नाही. कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी केवळ पैसा आवश्यक नाही, तर आरोग्य, नाती, मनःशांती व वाढ या चार महत्वाच्या गोष्टींची गरज असते. त्यासाठी निसर्ग ७ महत्वाचे नियम सांगतो.
१ ) सकाळ जिंकली तर तुम्ही दिवस जिंकू शकता : दररोज पहाटे उठणे, ३० मिनिटे चालणे / योगा करणे, दिवसभरात मला काय कामे करायची आहेत, हे ठरवणे, हे पथ्य पाळणारे यशस्वी लोक दिवस सुरु होण्याआधीच दिवस जिंकतात.
२ ) कोणत्याही एका गोष्टीत मास्टर व्हा : एखाद्या विशिष्ट क्षेत्रावर लक्ष केंद्रित करा, पत्रकारितेत जसा मी खोलवर जातो, तसेच एखाद्या क्षेत्रात इतके चांगले काम करा कि लोक तुमच्या नावाने त्या विषयाला ओळखू लागतील.
३ ) पैश्याचे ३ नियम : मेहनतीने कमावलेल्या पैश्यापैकी ५० % खर्च : ३० % गुंतवणूक व २० % शिकण्यासाठी, कर्ज घेऊन हौस – मौज करणे टाळा, कर्ज हे संपत्ती वाढण्यासाठी घ्या, शिक्षण, उद्योग व रोजगार क्षेत्रातील बदलाची आवर्जून दखल घ्या,
४ ) नातेसंबंध जपा : यश एकट्याने येत नाही, रोज किमान एका व्यक्तीला मदत करा, वडीलधाऱ्याचा आशीर्वाद, मित्रांचे नेटवर्क आणि कुटुंबासाठी वेळ या तीन महत्वाच्या बाबीचा त्यामध्ये समावेश आहे. हे तीन सोबत असतील तर कोणतेही संकट मोठे वाटणार नाही.
५ ) अपयशाला घाबरून जाऊ नका : प्रत्येक अपयश हे शाळेच्या फी प्रमाणे आहे, जी तूम्ही शिकण्यासाठी भरता, मी काय शिकलो ? हे लिहून ठेवा, पुढच्या वेळी तेच तुमचे हत्यार बनेल.
६ ) आरोग्य : खरी संपत्ती – दररोज सात तास झोप, भरपूर पाणी, रात्री १०.०० नंतर मोबाईलपासून दूर, शरीरच जर साथ देत नसेल तर आपल्याला यशाचा आनंद उपभोगता येत नाही.
७ ) रोज १ % चांगले व्हा :
कालपेक्षा आज मी १ % अधिक चांगले होईन, अशी मनाची धारणा ठेवा, वर्षभरात तुम्ही ३७ पटीने पुढे असाल.
मी माझा दिवस अशा पद्धतीने व्यतीत करतो,
सकाळी नियोजन, दुपारी कठोर मेहनत, संध्याकाळी कुटुंब व रात्री आत्मचिंतन,
मित्रानो, सर्वसामान्य माणसाच्या यशस्वी जीवनाचे सर्वात मोठे रहस्य समाधान, सातत्य व योग्य नियोजन यामध्ये दडलेले आहे. वेळेचे अचूक महत्व ओळखून प्रत्येक दिवसाचा सदुपयोग करणे,संयम राखणे व मनाचे समाधान यावर भर देत चला…

