दीपक मोहिते,
ब्रिक्स परिषदेचा भारताला मोठा फायदा होणार आहे,वाढवण बंदरासाठी जगभरातून गुंतवणूकदार येणार, वसई व पालघरमधील तरुणांना ब्रिक्समध्ये स्टार्टअपची संधी मिळणार,
आजपासून दिल्लीत सुरु झालेल्या ब्रिक्स परिषदेला सर्व देश व १० पार्टनर देशाचे प्रमुख उपस्थित आहेत.
भारत,बेलारुस,
इराण,रशिया, चायना कझाकस्तान, मलेशिया, थायलंड, क्यूबा,ब्राझील,नायजेरिया, उझबेकिस्तान, युगांडा, व्हिएतनाम, फिलिपीन्स, संयुक्त राष्ट्र समितीचे महासचिव अँटॉनियो गुटरेस,यांचा समावेश आहे. या परिषदेत एकूण सात ते आठ मुद्द्यावर चर्चा होणार आहे. यामध्ये भारत, ब्राझील व दक्षिण आफ्रिका या देशाच्या भूमिकेला बळ देण्याचे समर्थन, स्थानिक चलनातील व्यापारवाढीसाठी ब्रिक्स पेमेंट टास्क फोर्स तयार करणे, दहशतवादाचा निषेध व ग्लोबल साऊथ मधील गरिबी निर्मूलनासाठी एकत्रित काम करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI ) आणि डिजिटल पायाभूत सुविधा ( UPI मॉडेल ) सर्व देशात पोहोचवणे, हवामान बदलावरील उपाययोजनेसाठी विकसित देशांनी १०० अब्ज डॉलर्सची मदत करणे, नॅशनल डेव्हलपमेंट बँकेला अधिक भांडवल देणे, युक्रेन व गाझामध्ये शांततेसाठी संवादाचा मार्ग स्विकारणे,इ. चा त्यामध्ये समावेश आहे.
१ जाने. २०२६ पासून भारताकडे परिषदेचे अध्यक्षपद आहे. गेल्या वर्षी ब्राझीलकडे अध्यक्षपद होते. भारत मंडपम दिल्ली येथे होणाऱ्या या अठराव्या परिषदेत लवचिकता, नवकल्पना, सहकार्य व शाश्वतता असे चार स्तंभ ठरवण्यात आले आहेत. तसेच अमेरिकन डॉलर्सची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ब्रिक्स परिषदेच्या सदस्य देशांनी आपापल्या चलनात व्यापार करावा, यासाठी ठोस निर्णय घेण्यात येणार आहे. भारताचा युपीआय, रशियाचा एसपीएसएफ, चीनचा सीआयपीएस हे एकमेकांशी जोडणे, नॅशनल डेव्हलपमेंट बँक, शांघाय कडून भारताला १० अब्ज डॉलर्सचे कर्ज देणे, पालघरच्या वाढवण बंदरासाठी ब्रिक्सच्या सदस्य देशातून गुंतवणूक आणणे, संयुक्त राष्ट्र समिती मध्ये ( युनो ) भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे, म्हणून ब्रिक्सचा पाठिंबा,
दरम्यान काल रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन व मोदी यांची एकमेकासमवेत बैठक होऊन २०३० पर्यंत दोन्ही देशात १०० अब्ज डॉलर्स व्यापाराचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. तसेच रेल्वे व अणूऊर्जा क्षेत्रात करार करण्यात आला. या परिषदेला जगभरातील ५०० मोठे गुंतवणूकदार उपस्थित राहीले असून या मध्ये १ ट्रिलियन डॉलर्स गुंतवणूकीसंदर्भात चर्चा होणार आहे. या परिषदेमुळे ग्लोबल साऊथ म्हणजे जागतिक दक्षिण क्षेत्राचे नेतृत्व भारताकडे येणार आहे. तसेच पालघर व वसई सारख्या भागातील तरुणांना ब्रिक्स स्टार्टअपमध्ये संधी मिळणार आहे. रशियाकडून स्वस्त तेल मिळणार असून देशातील पेट्रोल व डिझेलचे दर नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे. १४ सप्टेंबर रोजी या परिषदेचा जाहीरनामा आपल्या परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

