दीपक मोहिते,
चारोटी येथे स्मार्ट मीटर विरोधात महा रास्ता रोको, हजारो महिला रस्त्यावर,
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ठप्प,
आज १० सप्टें.२०२६ रोजी सकाळी चारोटी नाका, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात प्रचंड रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे हजारो आदिवासी आणि शेतकरी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार पट्ट्यातील महिला पारंपारिक साड्यांमध्ये रस्त्यावरच ठिय्या मारून बसल्या होत्या. हातात सिपीएमचे लाल झेंडे, ‘स्मार्ट मीटर हटाओ,’च्या जोरदार घोषणा देण्यात येत होत्या.

चारोटी नाका येथे
अंदाजे ८ ते १० हजार लोक या आंदोलनात सहभागी झाले होते.त्यामध्ये ७०% महिला होत्या.पावसाळी ढगाळ वातावरण असताना लोक रस्त्यावर ठाण मांडून बसले होते.
सक्तीचे स्मार्ट मीटर लावणे तात्काळ बंद करा,
वाढीव वीज बिल मागे घ्या, आदिवासींच्या वनहक्क जमिनीवरचे अतिक्रमण थांबवा, मनरेगा कामे पुन्हा सुरू करा, अशा मागण्या करण्यात आल्या.
या रास्ता रोकोमुळे मुंबईकडे जाणारी आणि गुजरातकडे जाणारी वाहतूक सुमारे २ ते ३ तास ठप्प होती. त्यामुळे पोलिसांनी वाहतूक अन्य परिसरातून वळवली होती.

