दीपक मोहिते,
” निवडणूक पर्व,”
पालघर जिल्हा परिषद / ८ पंचायत समित्याच्या निवडणुकामध्ये महायुती बाजी मारणार…
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुकामध्ये महानगरपालिका निवडणुकासोबत इतर संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.ग्रामीण भागातील जिल्हा परिषदा,पंचायत समित्या, नगरपरिषदा,नगरपंचायती व सहकारी संस्थाचा त्यामध्ये समावेश असेल.या सर्व संस्था आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष प्रयत्नशील असतो.त्यामुळे सारेच पक्ष सध्या कामाला लागले आहेत.या सर्व निवडणुका एकाचवेळी घेणे शक्य झाले नाही तर निवडणूक आयोग महानगरपालिका निवडणुका पार पडल्या की निवडणूक आयोग जिल्हा परिषद व पंचायत समित्याच्या निवडणुका जाहीर करेल, अशी शक्यता आहे.जिल्हा परिषदा व पंचायत समित्याच्या निवडणुका मागाहून होणे,सत्ताधारी पक्षाना सोयीचे ठरणार नाही. त्यामुळे त्या महानगरपालिका निवडणुकासोबतच होतील, असा अंदाज आहे.
पालघर जिल्हा परिषद व पंचायत समित्यामध्ये महायुतीचे वर्चस्व आहे.त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुका महायुतीने खिश्यात घेतल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.त्यामुळे महायुती सरकार या सर्व निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात,यासाठी प्रयत्नशील आहे.पण पुरेसे मनुष्यबळ व प्रचंड क्षेत्रफळ अशा दोन कारणामुळे या निवडणुका एकत्र घेणे शक्य होणार नाही.
पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समितीचे गण याविषयींची माहिती,
१ ) पालघर तालुका – जिल्हा परिषद गट – १७,
पं.स.-३४,
२ ) वसई तालुका – जिल्हा परिषद गट – ०४,
पं.स.-०८,
३ ) तलासरी तालुका – जिल्हा परिषद गट – ०५
पं.स.- १०,
४ ) वाडा तालुका – जिल्हा परिषद गट – ०६,
पं.स.- १२,
५ ) मोखाडा तालुका – जिल्हा परिषद गट – ०३,
पं.स.- ०६,
६ ) जव्हार तालुका – जिल्हा परिषद गट – ०४,
पं.स.- ०८,
७ ) डहाणू तालुका – जिल्हा परिषद गट – १३,
पं.स.- २६,
८ ) विक्रमगड तालुका – जिल्हा परिषद गट -०५,
पं.स.- १०,
पालघर जिल्हा परिषद एकूण गट – ५७,
पालघर जिल्ह्यातील ०८ पंचायत समितीचे एकूण गण – ११४,
news 27.in media निवडणूक अंदाज,
निवडणुकीनंतर जिल्हापरिषदेत अशी स्थिती निर्माण होऊ शकते.
भाजप – १७,
शिवसेना शिंदे गट – २०,
शिवसेना ( उबाठा ) – १२,
मार्क्स.कम्यु.- ०३,
बविआ – ०३,
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – ०२,
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ०,
पंचायत समिती निवडणुकीनंतर निर्माण होणारे राजकीय पक्षाचे वर्चस्व,
१ ) तलासरी – भाजप,
२ ) मोखाडा – शिवसेना,शिंदे गट,
३ ) जव्हार – भाजप,
४ ) वाडा – भाजप,
५ ) विक्रमगड – शिवसेना ( शिंदे गट ) व भाजप (निलेश सांबरे यांचा शिंदे गटात नुकताच प्रवेश झाल्यामुळे या पंचायत समितीमध्ये शिंदे गटाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे.)
६ ) डहाणू – भाजप,
७ ) पालघर – शिवसेना शिंदे गट,
८ ) वसई – भाजप – बविआ,समसमान संधी,
वसई पंचायत समिती अधांतरीत होण्याची दाट शक्यता,

