Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, वसईमधील विविध विकासकामांचा आ.स्नेहा दुबे पंडित यांच्या हस्ते शुभारंभ, वसईतील विविध रस्त्यांच्या विकासकामांचा भव्य शुभारंभ कार्यक्रम आ.स्नेहा दुबे पंडित यांच्या हस्ते काल पडला. वसई विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या सुविधासाठी आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. वसई आणि बोईसर विधानसभा मतदारसंघातील वसई भागातील रस्त्यांची दुरावस्था आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी वसई मतदारसंघाच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वरील कामे तातडीने हाती घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांना आदेश देण्याची विनंती केली होती.या मागणीची तात्काळ दखल घेऊन मुख्यमंत्री यांनी यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिल्या होत्या. महानगरपालिका आयुक्तांनी सदर आदेशांचे त्वरीत पालन करून वसई…

Read More

दीपक मोहिते, दादरा नगरहवेली व दीव – दमण या केंद्रशासित प्रदेशात स्था.स्व.सं.च्या निवडणुकीत भाजपची सरशी,तर विरोधक भुईसपाट… पालघर जिल्ह्याला लागून असलेल्या दादरा नगरहवेली व दीव – दमण या केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपने विरोधकांचा धुव्वा उडवला आहे.एकतर्फी लागलेल्या या निकाला विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नुकत्याच पार पडलेल्या दादरा नगर हवेली आणि दीव दमण येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने १२२ पैकी तब्बल ९१ जागा ( सुमारे ७५% ) बिनविरोध जिंकल्या आहेत. काँग्रेसने या निवडणुकीवर आक्षेप घेतला असून त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भाजपाने निवडणूक आयोगाशी संगनमत करून या निवडणुका “…

Read More

दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” निवडणूक रणसंग्राम, ” पालघर नगरपरिषद निवडणूक ; भाजप वेगळी चूल मांडणार.. पालघर नगरपरिषदेची आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे.येथे शिवसेना ( शिंदे गट ) व भाजप या महायुतीच्या प्रमुख घटक पक्षाचे नाते विळ्या – भोपळ्याचे असून पालघरच्या ग्रामीण भागातील दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकमेकांना कायम पाण्यात बघत असतात.गेल्या महिन्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी शिंदे गटाचे सुमारे हजारभर कार्यकर्ते फोडल्यामुळे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या अशा फोडाफोडीच्या राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली व आम्हीही हा गलिच्छ प्रकार करू शकतो.त्यामुळे भाजपने महायुतीचा धर्म पाळावा,असा इशारा दिला आहे. भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गटाची साथसंगत…

Read More

दीपक मोहिते, ” निवडणूक संग्राम, ” पालघर जिल्ह्यातील तीन नगरपरिषदा व एक नगरपंचायतीची निवडणूक होणार… काल राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यकम जाहीर केला.यामध्ये पालघर जिल्ह्यातील पालघर,डहाणू व जव्हार या नगरपरिषदा तसेच वाडा या नगरपंचायतीचा समावेश आहे.नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी २ डिसें. रोजी मतदान होणार असून लगेच दुसऱ्या दिवशी ३ डिसें. रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.त्यामुळे निवडणूक क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यातील वाडा नगरपंचायतीमध्ये गेल्या निवडणुकीत एकूण १७ जागा होत्या.नगराध्यक्षपदी शिवसेना ठाकरे गटाच्या गीतांजली कोलेकर विराजमान झाल्या होत्या.एकूण १७ जागांपैकी शिवसेना ठाकरे गटाचे ४ नगरसेवक,भाजपा-६ शिवसेना शिंदे गट २,काँग्रेस २,राष्ट्रवादी १,बहुजन विकास आघाडी १,आरपीआय १…

Read More

दीपक मोहिते, हातबट्ट्याचा व्यवहार, ….अन्यथा एसटी महामंडळाच्या लाखमोलाच्या जमिनी धनदांडग्याच्या घश्यात जातील.. व्यवसायिक जेंव्हा मंत्री होतो, तेंव्हा त्याचा व्यवसायिक दृष्टिकोन मात्र तसाच राहतो. आपण आता केवळ व्यवसायिक नसून लोकसेवक आहोत,याची त्यांना जाणीव नसते.राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत.बिल्डर असलेल्या प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहनमंत्री आल्या आल्या त्यांची वक्रदृष्टी एसटी महामंडळाच्या मोक्याच्या जमिनीवर पडली व त्यांनी आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी या जमिनी विकण्याचा घाट घातला.परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मनसुबे धुळीस मिळवले.पण त्यानंतरही या प्रताप सरनाईकांचे प्रताप मात्र सुरूच आहेत. त्यांनी पुन्हा आर्थिक उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्याच्या हेतूने एसटी महामंडळ राज्यभरात स्वतः च्या जमिनीवर २५० ठिकाणी व्यवसायिक तत्त्वावर…

Read More

दीपक मोहिते, मत्स्यव्यवसायाच्या समस्यांबाबत मंत्रालयात बैठक, वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी गेल्या काही महिन्यांपासून वसई तालुक्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यापैकी अनेक विकासकामाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव आर्थिक निधीही दिला आहे.त्यामुळे तालुक्यातील रस्ते,उड्डाणपूल,रिंगरुट, एसटी सेवेत नव्या वाहनाचा समावेश,गृहनिर्माण संस्थांना ओसी,सीसी उपलब्ध करणे,स्वयंपुनर्विकास व मासेमारी व्यवसायाच्या समस्या,याचा त्यामध्ये समावेश आहे. काल त्यांनी मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील मासेमारी प्रश्नासंदर्भात भेट घेतली व प्रदीर्घ चर्चा केली.मासेमारी व्यवसायाला कृषी दर्जा दिल्याबद्दल त्यांनी राणे यांचे आभार मानले,तसेच मत्स्यव्यवसायाला भेडसावणाऱ्या समस्या,जेटी,नवीन रो रो सेवा सुरू करणे, मच्छीमारांच्या पारंपारिक जमिनी,मच्छीमारांच्या विविध मागण्या व प्रलंबित समस्या विषयी चर्चा केली.सदर बैठकीस…

Read More

दीपक मोहिते, ” निवडणूक रणसंग्राम,” निवडणूक आयोगाने लोकशाहीची मूल्ये पायदळी तूडवली… तब्बल पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मुंबई,ठाणे, पालघर व उर्वरित राज्यातील मतदारांचे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ समीप आली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सतत लांबणीवर पडत गेल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील विकासकामांचा अक्षरशः बोजवारा उडाला होता.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्व.निवडणुका आता लवकरच होत आहेत,त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रदीर्घ काळ प्रशासकीय राजवट राहणे,हे निकोप लोकशाहीचे लक्षण नाही,पण राजकीय पक्षाच्या दळभद्री राजकारणामुळे या निवडणुका सतत पुढे ढकलल्या गेल्या.काल राज्य निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पहिल्या टप्यातील एकूण २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.या निवडणुकीचे मतदान २…

Read More

दीपक मोहिते, भाजपची वाटचाल कोणत्या दिशेने ? ” हल्लाबोल,” भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नाशिक येथे झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात जे वक्तव्य केले,त्यावरून भविष्यात भाजपची वाटचाल कशी असेल,हे स्पष्ट होत आहे. नाशिक येथे झालेल्या भाजपा कार्यकर्ता संवाद मेळाव्यात चव्हाण,आपल्या भाषणात म्हणाले,” एक विचाराचं सरकार केंद्र,राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणणे गरजेचे आहे.कारण,एक विचारांच सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असेल तर केंद्र व राज्याकडून येणारा विकास निधी योग्य लोकांच्या हाती जाऊन त्याचा सदुपयोग होईल.” वरकरणी,त्यांचे हे वाक्य साधं व विकासासंदर्भात असावे,असे वाटत असले तरी,या वाक्यामध्ये वेगळेपण दडले आहे.केंद्र सरकारची वाटचाल जी एकधिकारशाहीच्या दिशेने सुरू झाली आहे,त्याला अनुसरून चव्हाण यांनी हे वक्तव्य केले…

Read More

दिपक मोहिते, ” दारुण वास्तव,” सरकार व विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहेत, आपले मायबाप सरकार व धनदांडगे,ग्रामीण भागातील आपल्या अन्नदात्यांची कशी क्रूर चेष्टा करत असतात,हे पालघर जिल्ह्यात नुकतेच अनुभवायला मिळाले.नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसात वाडा तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या ७ एकर शेतातील भाताचे पीक आडवे झाले.उद्दीग्न अवस्थेत सापडलेल्या या शेतकऱ्याने विमा कंपनीकडे नियमानुसार नुकसानभरपाईची मागणी केली.या मागणीनुसार पंचनामा करण्यात आला व बाधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात विमा कंपनीने झालेल्या नुकसानापोटी २ रु.३० पैसे जमा केले. सदर बातमी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली व शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.सरकार व खाजगी विमा कंपन्या आम्हा शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करतात,अशी भावना येथील शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे.या अशा घटना राज्याच्या…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्यकर्त्यांच्या नालायकपणामुळे एसटी सेवा मृत्युशय्येवर… ग्रामीण भागाची जीवन वाहिनी,अशी ओळख असलेली आपली जिवाभावाची एसटी सेवा आता शेवटचे आचके देऊ लागली आहे.मृत्यूशय्येवर निपचित अवस्थेत पडलेल्या या सेवेला प्राणवायू मिळण्याची शक्यता आता धूसर बनत चालली आहे.आपल्या राज्यकर्त्यांच्या नालायकपणामुळे चांगल्या सेवेची पार दुर्दशा झाली आहे.ग्रामीण भागातील जनता आजही या सेवेतील लालपरीला जीव लावत आहेत.तर दुसरीकडे आपले नालायक राज्यकर्ते या सेवेची तिरडी बांधू पाहत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी सेवा ही एकेकाळी देशभरात नावारूपाला आलेली सेवा म्हणून ओळखली जात असे.आज त्या सेवेची अवस्था ” पाहवत नाही,आणि सहनही होत नाही,” अशी झाली आहे.नोकरशाही व राज्यकर्ते या दोघांनी या सेवेचे अक्षरशः…

Read More