दीपक मोहिते,
निवडणूकपर्व,
अखेर अनिश्चितता संपली,न्यायालयाच्या निर्णयाने नागरिकांना मिळाला दिलासा,
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासंदर्भात आज दिलेल्या निकालाने महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे.आजच्या त्यांच्या या निकालाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्हा परिषद,पंचायत समित्या व महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत.त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे सर्वं थरावरून स्वागत झाले.हे स्वागत होणे साहजिकच आहे. शहरी व ग्रामीण भागाचा संपूर्ण प्रशासकीय कारभार,हा प्रदीर्घ काळ नोकरशाहीच्या ताब्यात राहणे,हे न्यायाला धरून नव्हते.त्यामुळे या निवडणुका ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून सतत लांबणीवर पडणे,हा प्रकारच मुळात नागरिकांचे हक्क व अधिकाराला बाधा आणणारा होता.पण राज्य सरकार व निवडणूक आयोग/ न्यायपालिका यांच्या मिलिभगतामुळे नागरिकांना आपले अधिकार व हक्कापासून प्रदीर्घ काळ वंचित राहावे लागले.
गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून निर्माण झालेली अनिश्चितता आजच्या निकालाने संपुष्टात आली आहे.आता जिल्हा परिषद पंचायत समिती व महानगरपालिकेच्या निवडणुका डिसें.महिन्याच्या अखेरीस किंवा जाने.महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.साधारणपणे या सर्वं निवडणुका फेब्रु.महिन्यात होण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्ह्यात १ जिल्हा परिषद,८ पंचायत समित्या तसेच वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग आता लवकरात लवकर जाहीर करेल,असा अंदाज आहे.या निवडणुकांचा कार्यक्रम कधीही जाहीर होऊ शकतो,हे गृहीत धरून सर्व राजकीय पक्षांनीही आपापल्या यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत.त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीत सारे राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरतील.सध्या तीन नगरपरिषदा व एका नगरपंचायतीच्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे.गेल्या सात दिवसात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह शेकडो उमेदवारांनी आपापले प्रभाग अक्षरशः पिंजून काढले.या निवडणुकीत महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला असून भाजप व शिंदे गटाची तोंडे
एकमेकांच्या विरुद्ध दिशेने वळली आहेत.
या चारही
निवडणूकीतील प्रचार आता अंतिम टप्यात आला असून प्रत्येक उमेदवाराने प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण केल्या असून येत्या सोम. सांय.५.०० वाजता प्रचार थांबणार आहे.त्यानंतर बुध.२ डिसें.रोजी मतदान होईल व लगेच दुसऱ्या दिवशी मतमोजणी करण्यात येणार आहे.एकूण १ लाख १६ हजार ६६० मतदार या निवडणुकीत आपला हक्क बजावणार आहेत.तर जिल्हा निवडणूक शाखेनेही या निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे.या निवडणुका पार पडल्यानंतर उर्वरित निवडणुकांचा कार्यक्रम लवकरात लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे.

