दीपक मोहिते,
बॉटमलाईन,
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीमध्ये बखेडा…
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विरोधी पक्षासह महायुतीमधील मित्रपक्षाचे नेते फोडण्याचा जो सपाटा लावला आहे.त्यामुळे शिंदे व अजित पवार यांच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.पंधरा दिवसापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिंदे गटाच्या सर्वच्या सर्व मंत्र्यांनी बहिष्कार टाकला होता.त्यामुळे महायुतीमध्ये सारे काही आलबेल नाही,हे उघड झाले.त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नुकतेच ” मला २ डिसें.पर्यंत युती टिकवायची आहे,” असे विधान केले.त्यांच्या या विधानाने सर्वत्र खळबळ उडवून दिली.
त्यांनी केलेल्या विधानानंतर एकनाथ शिंदे यांनी पलटवार करताना चव्हाण यांना चांगलेच खडे बोल सुनावले.त्यामुळे महायुतीचा रबर आता मोठ्या प्रमाणात ताणला गेल्याचे उघड झाले आहे.पूर्वी भाजप विरोधकांची माणसे फोडत असे,पण चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विरोधकासह आपल्या मित्रपक्षाची माणसे फोडण्याचे सत्र आरंभले. आता वरील विधान करून एकप्रकारे एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांना जणू गर्भित इशाराच दिला आहे.या सर्व घडामोडीवरून भाजपला आता,महायुतीला मोडीत काढायचे,अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या सहा महिन्यात शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात जे महत्वाचे प्रकल्प प्रस्तावित केले होते,त्यापैकी आठ प्रकल्पाना स्थगिती दिली.तसेच गटाचे मंत्री व खासदार/ आमदाराना विकासकामासाठी दिला जात नाही.अर्थमंत्री म्हणून काम करताना अजित पवार हे महाशय भाजप व शिंदे गटाच्या लोकांना आमदार फंड देत नाहीत.भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून त्यांची माणसे फोडणे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आमदार फंड देताना होणारा दुजाभाव,यामुळे महायुती मधील दोन मित्रपक्ष याविषयी २ डिसें.नंतर कसा निर्णय घेते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

