- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, बॉटमलाईन, ( नॅशनल डेस्कसाठी ) युद्ध आता थांबायलाच हवे, इराण – इस्त्रायल या दोन देशातील युद्धाला येत्या २८ मे रोजी तीन महिने पूर्ण होत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजवणारे हे युद्ध लवकरात लवकर थांबावे, यासाठी जगातील सारे देश देव पाण्यात टाकून बसले आहेत. निर्णय अंतिम टप्यात आला असला तरी समृद्ध युरेनियमचा तिढा जोवर सुटत नाही, तोवर युद्ध थांबेल,असे वाटत नाही. पाकिस्तान मध्यस्थ म्हणून भूमिका पार पाडत असला तरी ” समृद्ध युरेनियम आमच्या हवाली करा,” ही अमेरिकेची मागणी इराण मान्य करेल, असे वाटत नाही. अशा सर्व परिस्थितीमध्ये हे युद्ध अधिक काळ चालणे, हे जगातील एकाही देशाला परवडणारे नाही. हे…
दीपक मोहिते, पाऊस राज्याच्या उंबरठ्यावर ; शेतकरीवर्ग आनंदात…. मान्सून केरळमध्ये पोहोचला असून येत्या ४८ तासात कोकण किनाऱ्याला धडक देण्याची शक्यता आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ही बातमी असून हवामानखात्याने दिलेल्या या माहितीमुळे राज्यातील शेतकरी चांगलेच सुखावले आहेत. राज्यात साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाला सुरुवात होते. मात्र गेल्या महिन्याभरात उष्णतेने उच्चांक गाठल्यामुळे यावेळी मान्सूनचे आगमन लवकर होईल,असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. तो तंतोतंत खरा ठरला आहे.गेले दोन दिवस पालघर जिल्ह्यात अधून मधून पावसाचा शिडकावा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. पावसाचे आगमन वेळेवर झाल्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी सुगीचा ठरेल, अशी चिन्हे दिसत आहेत. राज्यात खरिपाच्या हंगामात भात,…
दीपक मोहिते, बॉटमलाईन, नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा खरा चेहरा समोर आला आहे… नेपाळचे नवीन पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताविरोधात निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. यामागे चीनचे कारस्थान असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही वर्षात सत्तेत आलेले राजकीय पक्ष हे चीनच्या नादी लागले होते.चीन हा नेपाळमध्ये सध्या प्रचंड आर्थिक गुंतवणूक करत आहे. विकासाचे अनेक प्रकल्प त्यांच्या आर्थिक मदतीच्या साहाय्याने सुरु करण्यात आले आहेत. पाच महिन्यापूर्वी नेपाळमध्ये सत्तातर होऊन बालेन शाह नेपाळचे पंतप्रधान झाले. त्यांनी आल्या आल्या भारतासोबत कटुता निर्माण होणारे अनेक निर्णय घेण्यास सुरुवात केली. माजी पंतप्रधान के. पी.ओली यांच्याशी आपले संबंध चीन मुळे ताणले गेले होते. त्यांच्या जाण्यानंतर आपले…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” कॉक्रोच जनता पार्टी ; सरकारने आत्मपरीक्षण करायला हवे… समाज माध्यमावर धुमाकूळ घालत असलेल्या ” कॉक्रोच जनता पार्टी, ” च्या असंख्य कार्यकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेश प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामागे ” शिक्षण व्यवस्थेतील बजबजपुरी, ” हे एकमेव कारण आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बारा वर्षाच्या कारकिर्दीत शिक्षण व्यवस्थेचे जे बाजारीकरण झाले, त्यामुळे देशभरातील कोट्यावधी तरुणांना सध्या प्रचंड नैराश्य आले आहे. खाजगी शाळा,महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेसना रालोआच्या काळात मोकळे रान मिळाले आणि त्यांनी अक्षरशः लूट केली. त्यामुळे आज आपली शिक्षण व्यवस्था पार रसातळाला गेली आहे.केंद्रीय व राज्याच्या शिक्षण विभागात ” कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही,” अशी…
दीपक मोहिते, उशिराने सुचलेले शहाणपणा, जिल्हा परिषद शाळांमध्ये आता अंगणवाडीचे वर्ग, आपले शिक्षण धोरण व शिक्षणाचा अधिकार धाब्यावर बसवणाऱ्या सरकारने उशिराने का होईना एक चांगला निर्णय घेतला आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आता अंगणवाडीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून ही योजना टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे. शाळांमधील रिकाम्या वर्गखोल्यांचा वापर अंगणवाड्यांसाठी होणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने यासंदर्भात सर्व जिल्हा परिषदांना नुकत्याच सूचना दिल्या आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार तीन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांच्या शिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यानुसार बालवाडी, अंगणवाडी आणि प्राथमिक शिक्षण एकत्रित पद्धतीने देण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे.…
दीपक मोहिते, मराठा आरक्षणावरून पुन्हा रणकंदन सुरू होणार…. मराठा आरक्षणावरून समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे ३० मे पासून पुन्हा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करणार आहेत. जरांगे यांच्या घोषणेने राज्य सरकार सावध झाले असून त्यांनी आ. प्रसाद लाड यांना जरांगे यांची भेट घेण्यासाठी पाचारण केले.या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. जरांगे यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे सरकार हा तिढा कसा सोडवते, याकडे राज्यातील मराठा समाजाचे लक्ष लागले आहे. हा तिढा सुटणे शक्य नसल्यामुळे आता केंद्र सरकारने या प्रश्नी हस्तक्षेप करण्याची गरज आहे, असे मराठा समाजाला वाटू लागले आहे. पण केंद्र सरकार या प्रकरणी हस्तक्षेप करेल, अशी शक्यता…
दीपक मोहिते, विधान परिषद निवडणूक : भाजप – १२, शिवसेना – ०३ व राष्ट्रवादी काँग्रेस – ०२, विधानपरिषदेच्या १७ जागासाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला चांगलाच वेग आला आहे. शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांनी याविषयी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की राज्यात आमची ताकद वाढली आहे, त्यामुळे आम्हाला ०७ जागा मिळाल्याच पाहिजेत. या सर्व राजकीय घडामोडींवर बोलताना सरनाईक पुढे म्हणाले, विधानपरिषदेसाठी कोणाला उमेदवारी द्यायची, याचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. यापूर्वी धुळे, कोकण या भागांत आमचे ०५ आमदार होते. आता पक्षाची ताकद वाढली असल्यामुळे आम्ही ०७ जागांची मागणी…
दीपक मोहिते, ज्योतीची ज्वाला होण्यास वेळ लागणार नाही… देशाचे सरन्यायधीश सूर्यकांत यांनी तरुणांचा उल्लेख ” झुरळ,” असा केल्यानंतर जे वादळ देशात घोंगावले, त्यावरून या देशातील तरुणांनी आपल्या दबलेल्या आवाजाला मोकळी वाट करून दिल्याचे मानण्यात येते आहे. शिक्षणासाठी अमेरिकेत स्थायिक झालेल्या अभिजित दिपके या मराठवाड्यातील तरुणाने या प्रकरणी महत्वाची भूमिका पार पाडली. त्याने सोशल मीडियावर ” कॉक्रेच जनता पार्टी,” नावाचे प्लॅटफॉर्म सुरू केले व देशभरातील राजकारण ढवळून निघाले. अवघ्या चार दिवसात एक्स, फेसबुक व इंस्टाग्राम या यावर त्यांच्या फॉलोअर्सनी अक्षरशः धुमाकूळ घातला. फॉलोअर्सची संख्या सुमारे १ कोटीच्या घरात गेल्यानंतर ” जेन झी, ” च्या चर्चेला उधाण आले व तरुणांच्या माध्यमातून बदल…
दीपक मोहिते, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात १३८ टक्क्यांनी वाढ,मग देशात दररोज सरासरी ८० शेतकरी आत्महत्या का करताहेत ? गेल्या १० वर्षाच्या मोदी सरकारच्या राजवटीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीहुन अधिक वाढ झाल्याचा दावा निती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी केला आहे. हे उत्पन्न १३८ टक्क्यांनी वाढले असल्याचे त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हंटले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.त्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यायला हवी. राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र व धोरण संशोधन केंद्राचे माजी संचालक रमेश चंद यांनी गेल्या १० वर्षात कृषी व संलग्न क्षेत्राने ४.४५ टक्के उत्पन्न वाढले व ही वाढ ऐतिहासिक अशी असून यापूर्वी कधीही इतकी वाढ झाली नव्हती, असा…
दीपक मोहिते, कांदा उत्पादक शेतकरी मरणासन्न अवस्थेत जीवन जगतोय, कांद्याच्या दरात यंदा झालेली प्रचंड घसरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दिशेने नेणारी ठरली आहे. राज्याच्या तमाम बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात प्रचंड घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. मात्र त्याला या अस्मानी संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारकडून कोणतीही हालचाल होत असल्याचे पाहायला मिळत नाही. निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. निर्यातीवर बंदी येण्यापूर्वी कांद्याला प्रति क्विंटल साडेचार हजार रु.दर मिळत होता. आज त्याच कांद्याला प्रति क्विंटल एक हजार रु.दर मिळत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यापेक्षा कांदा खाणाऱ्या ग्राहकांची संख्या असल्यामुळे सरकार केवळ त्यांच्या मताचा विचार करते. पण आता सरकारच्या दिशाहीन…
