Author: दीपक मोहिते

वसंत भोईर,वाडा वैश्य समाज संघाचा वधु – वर मेळावा उत्साहात संपन्न, मंगला हॉल कोपरी ठाणे येथे काल पालघर महाराष्ट्र वैश्य समाज संघाचा वधु वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ठाणे पालघर तसेच रायगड व नाशिक जिल्ह्यातील अनेक वधू वर मोठ्या उपस्थित होते.३२व्या वधू वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष सीमाताई महाजन,जिल्हा संघाचे अध्यक्ष निलेशजी गंधे,समन्वय समिती प्रमुख दिलीप भोपतराव, रायगड जिल्हा वैश्य समाजाचे अध्यक्ष अशोक भोपतराव, उपाध्यक्ष प्रीयेश जगे निलेश कोंडलेकर जिल्हा महिला प्रतिनिधी पूजा काबाडी, जिल्हा उप महिला प्रतिनिधी मयुरी तोंडलीकर, समितीचे सभापती निमेष खडकबाण,चिटणीस, सह चिटणीस,विश्वस्त,सल्लागार, माजी अध्यक्ष,सभापती,गट सभापती,तसेच वधू-वर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.…

Read More

नवीन पाटील,सफाळे इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प  ; प्रवाशांचे झाले अतोनात हाल, पश्चिम रेल्वेच्या सफाळे आणि केळवे रोड रेल्वेस्थानका दरम्यान बिकानेर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने आज दुपारी साधारण साडेतीन ते चारच्या सुमारास गुजरातकडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. पश्चिम रेल्वेकडून इंजिनमधील बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाल्यानंतर अर्धा तासाच्या विलंबानंतर रेल्वेसेवा पूर्ववत झाली.पश्चिम रेल्वेच्या डहाणू व गुजरातच्या दिशेने धावणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवांसह लांब पल्ल्याच्या सेवा आज दुपारी अर्धातास ठप्प झाल्या होत्या.भर दुपारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे प्रवासी संतप्त झाले होते. गुजरातकडे जाणाऱ्या बिकानेर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये सफाळे ते केळवा रोड स्थानकाच्या दरम्यान अचानक बिघाड झाल्यामुळे ती जागीच थांबून…

Read More

जव्हार प्रतिनिधी सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र,जव्हार येथे रक्तदान शिबीर, सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र,जव्हार यांच्यातर्फे पतंगशाह कुटीर रुग्णालय, जव्हार येथील रक्तकेंद्र येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमात एकूण ६५ रक्तदाते सहभागी झाले.अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी वाट पाहणारे रुग्ण,गरोदर माता तसेच विविध आजारांनी त्रस्त असंख्य रुग्ण यांच्यासाठी रक्तदान हेच जीवनाचे आधारस्तंभ ठरते.त्यामुळे प्रत्येक आरोग्यदायी व्यक्तीने नियमितपणे रक्तदान करणेही काळाची गरज आहे,असे यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पतंगशाह कुटीर रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक,वैद्यकीय अधिकारी, रक्तकेंद्र सक्षम अधिकारी, संपूर्ण वैद्यकीय कर्मचारी वर्ग यांनी दिलेले सहकार्य उल्लेखनीय आहे.सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र, जव्हार यांच्यावतीने सर्व रक्तदात्यांचे तसेच रुग्णालय प्रशासनाचे मनःपूर्वक आभार व्यक्त…

Read More

सचिन परब,वसई कांदळवन कत्तलप्रकरणी जनमाहिती अधिकाऱ्याकडून दिशाभूल करणारा अहवाल, वसईतील पाचुबंदर येथील कांदळवन नष्ट केल्याप्रकरणी उपविभागीय अधिकारी, वसई यांच्याकडे दाखल असलेल्या प्रकरणात अधिकाऱ्याने सदोष अहवाल सादर केल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी उपविभागीय कार्यालयातील जनमाहिती अधिकाऱ्याची चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मालोंडे सर्वे क्रमांक ७३/६ या पाचूबंदर,वसई येथील जागेवर कांदळवनाची कत्तल करून प्रचंड मातीभराव करण्यात आला होता.या जागावर बंगले उभारण्यात आले आहेत.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आल्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा सखोल अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. या मंडळ अधिकाऱ्याने सर्वे क्रमांक जाणीवपूर्वक दिशाभूल करणारा नमूद केल्यामुळे दिशाभूल…

Read More

संजय लांडगे,वाडा वाड्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी, वाडा शहरातील सिद्धार्थ नगर येथे सिद्धार्थ युवक मित्र मंडळातर्फे विश्वभूषण, भारतरत्न,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक अभिवादन सभा व त्यानंतर काल भारतरत्न,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी बुद्ध वंदना घेण्यात आली,यावेळी बौद्ध बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान प्रबोधन सत्रात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार,रोशन पाटील, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष निलेश पाटील,पत्रकार युवराज ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.नुकत्याच पार पडलेल्या क्रीडा स्पर्धकांचा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या…

Read More

दीपक मोहिते, भयानक परिस्थिती, अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वसईची चारही शहरे बकाल, वसई-विरार उपप्रदेशात अनधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नाने अक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे.यावर नियंत्रण आणण्याकामी वसई-विरार शहर महानगरपालिका सपशेल अपयशी ठरली आहे.नालासोपारा रेल्वे स्थानक व तूळींज पोलीस ठाणे परिसराला अनधिकृत फेरीवाल्यानी वेढा घातला असून त्यांना हटवण्यासंदर्भात पोलीस यंत्रणा देखील हतबल झाली आहे.हे सर्व अनधिकृत फेरीवाले परप्रांतीय असून त्यांना एका परप्रांतीय कुटुंबाचे संरक्षण आहे.या शहराच्या पूर्व भागातील तूळींज,आचोळे या दोन परिसरात करदात्यांना रस्त्यावरून चालणे देखील कठीण झाले आहे.पदपथावर आक्रमण करणारे पोलीस,मनपा अधिकारी व माजी नगरसेवक व नगरसेविका यांना दरमहा ठराविक रक्कम देत असतात,त्यामुळे या ज्वलंत समस्येची आजवर उकल होऊ शकली नाही.हप्ते वसुली वरून…

Read More

दीपक मोहिते, हल्लाबोल, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे पार मोडून पडले आहे, गेल्या सात दशकात आपल्या देशाची आर्थिक स्थिती इतकी कधीच खालावली नव्हती,असे निती आयोगाच्या तज्ज्ञांच्या समूहाने म्हंटलं आहे.आपली अर्थव्यवस्था अत्यंत बिकट परिस्थितीतून जात असल्याचे निती आयोगाच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे. देशाचा अर्थसंकल्प नूकताच जाहीर झाला आहे.मात्र या अर्थसंकल्पात सर्वसामान्य माणूस किंवा लाखाचा पोशिंदा असलेला शेतकरी कुठेच पाहायला मिळत नाही.दैनंदिन जीवनात सर्वसामान्य माणसाच्या गरजेच्या वस्तू उदा.दूध,दही,सारख्या वस्तूवर जिएसटी लावणारे केंद्र सरकार हे आपले सरकार कधीच होणार नाही.अशा परिस्थितीमध्ये ट्रम्प सरकारने आपल्या देशावर २६ % टॅरिफ लादून आपल्या प्रिय मित्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे आपले पंतपधान नरेंद्र मोदी आता अमेरिकेत जाऊन “…

Read More

सुरेश काटे,तलासरी बंधाऱ्याच्या पाण्यात पडून एकाचा मृत्यू अंघोळीसाठी बंधाऱ्याच्या पाण्यात उतरलेल्या एका इसमाचा नाका,तोंडात पाणी जाऊन मृत्यू झाल्याची घटना तलासरी पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून याबाबत तलासरी पोलीस स्टेशनाला आकास्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे काल संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान दापचरी येथील महादेव मंदिरा समोर असलेल्या नदीवरील बंधाऱ्याच्या पाण्यात अंघोळ करण्या साठी उतरलेल्या भूपेंद्र चिमणलाल प्रजापती वय ५७ वर्ष रा.मदनवाड मिस्त्री चाळ तालुका बलसाड जिल्हा बलसाड राज्य गुजरात,यांचा बंधाऱ्यातील पाणी नाका तोंडात जाऊन मृत्यू झाला,याप्रकरणी तलासरी पोलीसानी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

Read More

वसंत भोईर,वाडा पाण्यासाठी महिलांना रात्रभर लागते जागावे लागते ;. महिलांना विहीरी,नदीपात्रात पाण्यासाठी उतरावे लागते, वाडा तालुक्यापासून अवघ्या तीन कि.मी.अंतरावर असलेल्या हरोसाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावठाण पाडा व उंबरोठे ग्रामपंचायत क्षेत्रातील नदीपाडा येथील विहीरींनी तळ गाठला आहे.दोन ते तीन हंडे पाण्यासाठी संपूर्ण रात्र जागरण करून येथील महिलांना पाणी भरावे लागत आहे.या गावपाड्यासाठी मंजूर असलेली जलजीवन योजनेची पाणी पुरवठा योजना अडीच वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी त्राही त्राही झाली आहे. वाडा शहरापासून अवघ्या तीन कि.मी. अंतरावर हरोसाळे ही ग्रामपंचायत आहे.या ग्रामपंचायतीच्या हद्दीत गावठाण पाडा असून या पाड्याची लोकसंख्या तीनशेच्या आसपास आहे.या पाड्यासाठी एक विहीर असून पाण्याची पातळी खोलवर गेली आहे.त्यामुळे गावात…

Read More

वसंत भोईर,वाडा माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न, वाडा तालुक्यातील आंबिस्ते हायस्कूल येथील १९९३-९४ मध्ये दहावीत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन लेक फिशरिया ऐनशेत येथे मोठ्या उत्साहात साजरे झाले. सर्वच सवंगड्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाला दिला.तो काळ कठीण होता,रोजगाराची फारशी साधने नव्हती.त्यामुळे प्रत्येकाने हलाखीच्या परिस्थितीमध्ये घेतलेल्या शिक्षणाची आठवण अनेकांच्या मनोगतातून व्यक्त झाली.यावेळी उपस्थित भगिनींना उद्योजक जगदीश पाटील यांच्यातर्फे साड्यांची भेट देण्यात आली.या कार्यक्रमाचे आयोजन करून ते यशस्वीपणे पार पाडण्याचे काम सर्व सहकाऱ्यांनी केले.

Read More