- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- जांभूळ विहीर पूर्व येथे भंगार दुकानामुळे रहिवासी त्रस्त,
- भालीवली गावातील सिंचन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणे हटवा,
- एकमेकांच्या उरावर बसणे सोडा व करदात्यांचे हीत जोपासा,
- आम्ही वसईकर दूधखुळे नाहीत,
- पालघर येथे डॉक्टरांवर हल्ला ; न्यायालयाने गंभीर दखल घ्यावी,
- नेपाळ नंतर भारताला सर्वाधिक धोका,
- पहिली बुलेट ट्रेन ऑगस्ट २०२७ पासून धावणार,
- अशा लोकांना रस्त्यावर मोकाट फिरण्याचा अधिकार नाही,- सर्वोच्च न्यायालय,
Author: दीपक मोहिते
संजय नेवे,विक्रमगड विक्रमगड तालुक्यातील टेटवाली गावाला पालकमंत्र्यांची भेट, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी विक्रमगड तालुक्यातील नुकसानग्रस्त टेटवाली गावाची काल पाहणी दौरा केला.यावेळी नुकसानग्रस्त झालेल्या कुटुंबाला नुकसान भरपाई तत्काळ मिळेल,असे वाटत होते,परंतु नुकसानभरपाई न मिळाल्यामुळे बाधित कुटुंबे नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी नुकसानग्रस्तांना सीएसआर फंडातून तातडीची मदत व अन्न धान्य देण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या आठवड्यात विक्रमगड तालुक्यातील टेटवालीसह नऊ गावाचे वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान केले होते.अनेक घरावरील छप्परे,कौले व पत्रे उडाले होते,तर काही घरांच्या भिंती पडल्या होत्या.या घटनेत दहा ग्रामस्थ जख्मी झाले होते. तर वीज कोसळून शेतकऱ्यांचे दोन बैलही मृत्युमुखी पडले होते. वादळी वाऱ्यामुळे नागरिकांच्या…
दीपक मोहिते, पंचायतराज व्यवस्थेची ऐसी तैसी, उ वसई तालुक्याच्या वार्षिक आमसभेचे दहा वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर उद्या आयोजन, वसई तालुक्याच्या सन २०२४ – २५ या वर्षाची वार्षिक आमसभा उद्या ४ जून रोजी सकाळी ११.०० वाजता यंग मॅन कॅथलिक असोसिएशन सभागृह, माणिकपूर, ता. वसई, जि. पालघर येथे आयोजित करण्यात आली आहे. तब्बल दहा वर्षाच्या कालावधीनंतर ही आमसभा होत आहॆ.पंचायत राज व्यवस्थेत ग्रामसभा व आमसभाना अनन्यसाधारण महत्व असते.लोकांसाठी या सभा हक्काचे व्यासपीठ आहॆ. पण गेल्या काही वर्षात ही व्यवस्था मोडीत काढण्याचे प्रशासनातील अधिकारी व राजकीय पदाधिकाऱ्यांची अभद्र युती झाल्याचे पाहायला मिळाले. या आमसभा का झाल्या नाहीत ? याविषयी गेल्या दहा वर्षात एकाही मुख्य…
दीपक मोहिते, ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीचा ७७ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा… ग्रामीण भागातील जनतेची नाळ विकासाशी जोडण्यात एस.टी परिवहन सेवेचा सिंहाचा वाटा आहे.१ जून हा एस.टी.परिवहन सेवेचा वर्धापनदिन.संपूर्ण राज्यात गेल्या ३ वर्षापासून वर्धापनदिन राज्याच्या सर्व आगारात साजरा करण्यात यावा,असे राज्य सरकारने जाहीर केले आहे.वसईतील एस.टी.कामगार संघटना मात्र सरकारचा आदेश येण्याआधीच गेल्या २० वर्षापासून वर्धापनदिन साजरा करत आहे. आपल्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीचा काल ७७ वा वर्धापन होता.यावेळी वसई एस.टी.कामगार संघटनेने हा वर्धापनदिन वसई गाव बस आगारासमोर साजरा करण्यात आला.एस.टी.परिवहन सेवा कर्मचाऱ्याच्या प्रचंड मेहनतीने व प्रवाशांच्या सहकार्यामुळे आज नफ्यात आहे.परंतु, गेल्या काही वर्षात जुन्या बसेस बदलून नवीन बस खरेदी…
दीपक मोहिते आपत्तीशी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सज्ज राहावे – पालकमंत्री नाईक, राज्यामध्ये कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत असून पालघर जिल्ह्यामध्येही काही रुग्ण आढळले आहेत.या आपत्तीशी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सज्ज रहावे,असे निर्देश वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसानीचा आढावा.तसेच संभाव्य आपत्तीचा आढावा पालकमंत्री गणेश नाईक यांनी नुकताच जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेतला. यावेळी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल,खा.डॉ.हेमंत सवरा,आ.राजेंद्र गावित , जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,पोलीस अधीक्षक देशमुख,अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे,जव्हार आणि डहाणूचे प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासुर,विशाल खत्री,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे,उपजिल्हाधिकारी…
दीपक मोहिते, पालघर जिल्ह्याच्या जलजीवन मिशन योजनेची केंद्रीय सचिवांनी केली पाहणी, भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचे सचिव अशोक कुमार के.मिना यांनी पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील ५८ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलj जीवन मिशन योजनेच्या जलस्त्रोत आणि पाणी शुद्धीकरण केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली.या भेटीदरम्यान त्यांनी योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि स्थानिक स्तरावरील अंमलबजावणीचे मूल्यमापन केले.यावेळी त्यांच्या सोबत राज्य पाणी व स्वच्छता विभागाचे अभियान संचालक ई.रविंद्रन, पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड,मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,जव्हारच्या प्रकल्प अधिकारी अपूर्वा बसुर, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश पाध्ये, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय मुळे,मोखाडा गटविकास अधिकारी…
दीपक मोहिते, पाहणी दौऱ्याचे इव्हेंट व सोहळे झाले उदंड ; पण विकासकामे मात्र जाग्यावरच….. वसई व नालासोपारा मतदारसंघात गेल्या सहा महिन्यात असंख्य इव्हेंट पार पडले.या सर्व इन्व्हेंटस सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनाशी किती निगडित आहे,हा एक संशोधनाचा विषय ठरू शकतो.नवीन आमदारांची निवड,त्यांचे सत्कार सोहळे,अर्धवट अवस्थेत असलेल्या विकासकामांची केवळ पाहणी करणे,( अद्याप विस्कळीत असलेला पाणीपुरवठा,पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा उड्डाणपूल व ४१ इमारतीमधील ४०० कुटुंबाचे पुनर्वसन,या व्यतिरिक्त अनेक विकासकामे आजही अर्धवट अवस्थेतच आहेत.) अशी विकासकामे अद्याप अर्धवट अवस्थेत पडून आहेत.पण सोहळ्यांचे इव्हेंटसना अक्षरशः उत आला आहे. तत्कालीन माजी आमदारांनी मंजूर केलेल्या विकसकामाचे श्रेय घेण्यासाठी सुरू असलेली धडपड,पाहता येणाऱ्या साडेचार वर्षात आपल्यासमोर काय…
दीपक मोहिते, ” अंधाधुंद कारभार,” अबब… एकही शाळा नसताना महानगरपालिकेकडून पंधरा वर्षात ३०० कोटी रु.चा शिक्षणकर वसुल, वसई – विरार शहर महानगरपालिका ही उभ्या महाराष्ट्रात बदनाम महानगरपालिका म्हणून ओळखली जाते.विकासकामातील टक्केवारी,बाजारकरांचे ठेके,नगरसेवकांच्या फंटर्स लोकांच्या हाती,अनधिकृत बांधकामात मनपा अधिकारी व नगरसेवकांची वसुली,नगरसेवक/ नगरसेविकामाची फेरीवाल्याकडून हप्तेवसुली,पाणी पुरवठा,इलेक्ट्रिक अग्निशमन,आरोग्य व वैद्यकीय साहित्य खरेदी, अनधिकृत बांधकामे करण्यात नगरसेवकांच्या फंटर्सचा सहभाग व आरक्षित जमिनी हडप करणे,अशा गोरखधंद्यामुळे ही ” मुन्नी पुरी बदनाम हूई…. गेली १५ वर्षे नगरसेवक,प्रतिनियुक्तीवर आलेले अनेक अधिकारी व त्यांना पाठवणारे मंत्रालयातील नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी महानरपालिकेची तिजोरी लुटून खाल्ली. महानगरपालिका कशी असू नये,याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वसई – विरार शहर महानगरपालिका…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महामार्गावर पोलिसांची खंडणी वसुली जोरात, मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग,हा दिवसेंदिवस प्रवाश्यासाठी त्रासदायक ठरु लागला आहे.वाहतूककोंडी,धुळीचे साम्राज्य,अर्धवट अवस्थेत असलेली दुरुस्तीची कामे,इ.गैरप्रकारामुळे मुंबई व गुजरात दिशेने दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.या महामार्गावर गेल्या पाच वर्षात झालेले अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या लक्षात घेता,हा महामार्ग कसा धोकादायक बनला आहे,हे दिसून येते.नागरिक,या सर्व अग्निदिव्यातून जात असताना आता वाहनचालकांना वेगळ्याच समस्याना सामोरे जावे लागत आहे.या महामार्गावरून ये-जा करणाऱ्यांकडून महामार्ग पोलिसांनी वाहनांची कागदपत्रे तपासण्याच्या नावाखाली सर्रास खंडणी वसुली सुरू केली आहे. महामार्गावरील वाहतुककोंडी,अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी महामार्ग पोलिसांनी अनेक ठिकाणी खंडणी वसुली केंद्रे सुरू…
वसंत भोईर,वाडा स्व.विष्णू सवरा स्मृती दिनानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन, माजी आदिवासी विकासमंत्री स्व.विष्णू सवरा यांच्या स्मृती दिनानिमित्त काल वाडा येथील भाजपच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच ग्रामीण रुग्णालय वाडा येथे रुग्णांना फळे व खाऊचे वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम युवा मोर्चेचे सरचिटणीस कुणाल साळवी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता. स्वर्गीय विष्णू सवरा यांनी सतत ३० वर्ष भाजपचे आमदार,राज्याचे आदिवासी विकासमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भिवंडी ग्रामीण व विक्रमगड भागातील जनतेची कामे केली.तसेच भाजपची विचारधारा गाव -खेड्यात पोहोचवून पक्ष बळकटीचे कार्य केले आहे.त्यांच्या जनसेवेचा वसा त्यांची दोन मुले डाॅ.हेमंत सवरा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पराभवानंतर बविआत आलेली मरगळ व अस्वस्थता,पक्षाला हानिकारक ठरू शकतात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर सध्या राजकीय पक्षांच्या हालचालींना सुरुवात झाली आहे.सर्वसाधारणपणे या निवडणुका ऑक्टो.होतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.त्यादृष्टीने काही राजकीय पक्ष कामाला देखील लागले आहेत.केंद्रीय निवडणूक आयोगाने १२० दिवसात ( चार महिने ) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश दिल्यानंतर आयोगाचे अधिकारी आता कामाला लागले आहेत.काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईला भेट देऊन निवडणूक कामाचा आढावा घेतला होता.या सर्व पार्श्वभूमीवर या निवडणुका समीप आल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व धामधुमीत राजकीय पक्ष देखील ” मुंबई कोणाची,” या एकमेव विषयावर आता आपले लक्ष केंद्रित…
