दीपक मोहिते,
पंचायतराज व्यवस्थेची ऐसी तैसी,
उ वसई तालुक्याच्या वार्षिक आमसभेचे दहा वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर उद्या आयोजन,
वसई तालुक्याच्या सन २०२४ – २५ या वर्षाची वार्षिक आमसभा उद्या ४ जून रोजी सकाळी ११.०० वाजता यंग मॅन कॅथलिक असोसिएशन सभागृह, माणिकपूर, ता. वसई, जि. पालघर येथे आयोजित करण्यात आली आहे.
तब्बल दहा वर्षाच्या कालावधीनंतर ही आमसभा होत आहॆ.पंचायत राज व्यवस्थेत ग्रामसभा व आमसभाना अनन्यसाधारण महत्व असते.लोकांसाठी या सभा हक्काचे व्यासपीठ आहॆ. पण गेल्या काही वर्षात ही व्यवस्था मोडीत काढण्याचे प्रशासनातील अधिकारी व राजकीय पदाधिकाऱ्यांची अभद्र युती झाल्याचे पाहायला मिळाले.
या आमसभा का झाल्या नाहीत ? याविषयी गेल्या दहा वर्षात एकाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने पंचायत समितीच्या गट विकास विकास अधिकाऱ्याला जाब विचारला नाही.
उद्या होणारी आमसभा ही आ.स्नेहा दुबे पंडित यांच्या अध्यक्षतेखाली होत आहॆ.या आमसभेला आ.राजन नाईक, विलास तरे,हे आवर्जून उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहॆ.
तालुक्यातील नागरिकांसाठी विविध विकास कामांचा आढावा घेणे आणि प्रशासनाशी संवाद साधण्यासाठी या आमसभा घेण्यात येत असतात.अनेक वर्षानंतर ग्रामीण भागातील जनतेला पुन्हा ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे सध्या आनंदाचे वातावरण पसरले आहॆ.या आमसभेस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तालुका पातळीवर होणाऱ्या निर्णयांबाबत पारदर्शकता आणि माहितीची देवाणघेवाण साधण्यासाठी ही वार्षिक आमसभा उपयुक्त ठरणार आहे,अशी माहिती सचिव आमसभा तथा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी प्रसिद्धी माध्यमाना दिली आहे.

