दीपक मोहिते
आपत्तीशी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सज्ज राहावे – पालकमंत्री नाईक,
राज्यामध्ये कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत असून पालघर जिल्ह्यामध्येही काही रुग्ण आढळले आहेत.या आपत्तीशी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सज्ज रहावे,असे निर्देश वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत.
अवकाळी पावसामुळे नुकसानीचा आढावा.तसेच संभाव्य आपत्तीचा आढावा पालकमंत्री गणेश नाईक यांनी नुकताच जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेतला.
यावेळी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल,खा.डॉ.हेमंत सवरा,आ.राजेंद्र गावित , जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,पोलीस अधीक्षक देशमुख,अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे,जव्हार आणि डहाणूचे प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासुर,विशाल खत्री,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे,उपजिल्हाधिकारी विजय जाधव,तेजस चव्हाण,आदी मान्यवर उपस्थित होते.
कोविडचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण करून घ्यावे,उपहारगृहामध्ये स्वच्छता राखावी व निर्जंतुकीकरण करावे.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करावे,कोविडचा प्रसार रोखण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व अत्यावश्यक सुविधा सुरू करण्यात याव्यात,नागरिकांनी आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेता नियमित हात स्वच्छ धुवावे तसेच निर्जंतूक करावे, असे आवाहन पालकमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी केले.
शाळा तसेच महाविद्यालयामध्ये उन्हाळी सुट्या लवकरच संपणार आहेत. या सुट्ट्या संपण्याअगोदर शाळा महाविद्यालयामध्ये साफसफाई करावी.शेतकरी बांधवांनी बोगस बी – बियाणे खरेदी करू नये.बोगस बी – बियाणे विक्री करणाऱ्या दुकानावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.शेतकरी बांधवांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या बी-बियाणे व खते कमी पडणार नाहीत पिक विमा मिळणे,हा प्रत्येक शेतकऱ्याचा हक्क असून यामध्ये कोणी गैरप्रकार करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.जिल्हा प्रशासनाचे कुपोषण मुक्त पालघर जिल्हा हे ध्येय असून हे ध्येय साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील कुपोषित बालकांना सशक्त आणि आरोग्य संपन्न करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
पाणी मिळणे,हा सर्व नागरिकांचा मूलभूत हक्क असून प्रत्येक घरामध्ये जल जीवन मिशन योजनेअंतर्गत शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. अवकाळी पावसामुळे घरे,शेती,बोटी व मत्स्यउत्पादन इ.चे नुकसान झाले आहे.या सर्व नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून निधी मिळण्यासाठी संबंधित प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.निधीची उपलब्धता होताच नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी जाहीर केले आहॆ.
प्रदूषणावर मात करून वातावरणातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी बांबू लागवड आवश्यक
दिवसेंदिवस वातावरणातील तापमान वाढत आहे.हे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड कमी करण्यासाठी ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या बांबूची लागवड करणे आवश्यक असल्याचे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी यावेळी सांगितले.
पालघर जिल्ह्यातील बांबू लागवडीचा आढावा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेण्यात आला
जिल्ह्यामध्ये १० हजार हेक्टर क्षेत्रामध्ये बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट असून २ हजार ५०० हेक्टरवर बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये एक किलो दगडी कोळसा वापरून जेवढी वीज निर्माण केली जाते. तेवढीच वीज एक किलो बांबू वापरून मिळते.कोळसा जळल्यामुळे प्रदूषणात वाढ होते,पण बांबू पासून प्रदूषण होत नाही.त्यामुळे औष्णिक विद्युत प्रकल्पात दगडी कोळशाचा वापर न करता बांबूचा वापर करावा,असे आवाहन पाशा पटेल यांनी केले.

