दीपक मोहिते,
ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीचा ७७ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा…
ग्रामीण भागातील जनतेची नाळ विकासाशी जोडण्यात एस.टी परिवहन सेवेचा सिंहाचा वाटा आहे.१ जून हा एस.टी.परिवहन सेवेचा वर्धापनदिन.संपूर्ण राज्यात गेल्या ३ वर्षापासून वर्धापनदिन राज्याच्या सर्व आगारात साजरा करण्यात यावा,असे राज्य सरकारने जाहीर केले आहे.वसईतील
एस.टी.कामगार संघटना मात्र सरकारचा आदेश येण्याआधीच गेल्या २० वर्षापासून वर्धापनदिन साजरा करत आहे.
आपल्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीचा काल ७७ वा वर्धापन होता.यावेळी वसई एस.टी.कामगार संघटनेने हा वर्धापनदिन वसई गाव बस आगारासमोर साजरा करण्यात आला.एस.टी.परिवहन सेवा कर्मचाऱ्याच्या प्रचंड मेहनतीने व प्रवाशांच्या सहकार्यामुळे आज नफ्यात आहे.परंतु, गेल्या काही वर्षात जुन्या बसेस बदलून नवीन बस खरेदी न करणे,कुशल कर्मचारी नियुक्ती न करणे,प्रशिक्षण शिबीरे न राबवणे,यामुळे प्रवासी एस.टी.सेवेपासून दूर जात आहेत.सध्या राज्याच्या ग्रामीण भागातील ६० लाख प्रवासी एस. टी.परिवहन सेवेचा लाभ घेत आहॆत.सदर संख्या प्रतिदिन १ कोटीवर नेण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आपण काम केले पाहिजे.एस.टी.वाचवायची असेल सेवा सुधारण्यावर कर्मचारी वर्गाने लक्ष दिले पाहिजे.असे मत एस. टी. कामगार संघटना नेते भरत पेंढारी यांनी व्यक्त केले.
राज्य शासनाने दरवर्षी नवीन ५ हजार बसेस सेवेत आणण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.नवीन दर्जेदार सुविधा प्रवाश्यांना देणे,एस.टी.द्वारे प्रवास सुरक्षित करता येतो,, याची जाणीव करून देणे. आदी संकल्प सरकार व युनियन एकत्र येऊन राबवण्याचा मानस आहे.एस.टी. व्यवस्थापन यांनी कर्मचारी वर्गाला त्रास न होता योग्य प्रशिक्षणद्वारे एस.टी.परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी पाऊले उचलण्याची गरज असल्याचे मत पालघर व वसई विभागातील कामगार नेत्यांनी व्यक्त केले.
ग्रामीण व नीमशहरी भागातील शेतकरी,छोटे उद्योजक, व व्यवसायिक यांना हातभार लावण्याचे काम एसटी परिवहन सेवेने केले आहे. एसटी ही ग्रामीण भागाची जीवन वाहिनी आहे.एसटी बंद करून महानगरपालिका सेवा वसईत लागू केल्यानंतर वसईकरांना झालेल्या यातनाची आम्हाला जाणीव आहे.आजही रात्री – अपरात्री महानगर पालिका बस सेवा नसल्याने अनेक वेळेला अडचणींना सामोरे जावे लागते त्यावेळी एसटीची खूप आठवण येते.वसईच्या विकासात,एसटीची प्रमुख भूमिका राहिली आहे.एसटी वाचली पाहिजे,टिकली पाहिजे,ही फक्त कर्मचारीचीच भावना नसून सामान्य जनता व प्रवाशांनाही एसटी आपल्या हक्काची वाटते व त्यामुळेच सामान्य जनता ही एसटीच्या खाजगीकरण विरोधात नेहमी आघाडीवर असते.आज आपली एसटी ७७ वर्षाची झाली.आपली एसटी हजारो वर्षे अशीच सेवा देत राहील,अशा शुभेच्छा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मॅकेन्झी डाबरे यांनी दिल्या.वसई पालघर विभागातून यावेळी मोठ्या प्रमाणात कर्मचारीवर्ग एसटीचा ७७ वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होता.
अ

