पहिली बुलेट ट्रेन ऑगस्ट २०२७ पासून धावणार,
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन बद्दल सविस्तर माहिती :-
सध्या या प्रोजेक्टचे ६१% पेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे.
गुजरातमधील पहिला टप्पा ( सुरत – वापी ) : ऑगस्ट २०२७ पासून पहिली कमर्शियल धाव सुरू होणार आहे.
गुजरातचा पूर्ण पट्टा ( वापी ते साबरमती ) : डिसें. २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
संपूर्ण कॉरिडॉर ( मुंबई ते साबरमती ) : डिसें. २०२९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
सुरुवातीचा अंदाजित खर्च रु. १,०८,००० कोटी होता. यापैकी ८१% म्हणजे रु. ८८ हजार कोटी रु.जपानची एजन्सी जे.आय.सी.ए. ( जपान इंटरनॅशनल कॊ – ऑपरेशन एजन्सी ) कर्ज म्हणून देत आहे. पण आता जमीन, बोगदे आणि साहित्याच्या वाढत्या किमतीमुळे खर्च वाढून तो जवळपास २ लाख कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
अंतर आणि वेळ
एकूण अंतर : ५०८ कि.मी.
वेग : ताशी ३२० कि.मी. वेळ : जर ट्रेन फक्त काही मोठ्या स्थानकांवर थांबली तर २ तास ७ मिनिटांत मुंबई ते अहमदाबाद अंतर पार होईल. सर्व स्थानकांवर थांबली तर २ तास ४५ मिनिटे लागतील.
एकूण स्थानके आणि नावे – १२ स्थानके,
महाराष्ट्रातील ४ स्थानके :
मुंबई ( बीकेसी – वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ) – हे भूमिगत स्थानक असणार आहे.
ठाणे, विरार व बोईसर,
गुजरात राज्यामधील ८ स्थानके : वापी,बिलिमोरा,सुरत,
भरुच,वडोदरा,आनंद / नडियाद,अहमदाबाद व
साबरमती हे शेवटचे स्थानक असेल.

