वसंत भोईर,वाडा
स्व.विष्णू सवरा स्मृती दिनानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन,
माजी आदिवासी विकासमंत्री स्व.विष्णू सवरा यांच्या स्मृती दिनानिमित्त काल वाडा येथील भाजपच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच ग्रामीण रुग्णालय वाडा येथे रुग्णांना फळे व खाऊचे वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम युवा मोर्चेचे सरचिटणीस कुणाल साळवी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता.
स्वर्गीय विष्णू सवरा यांनी सतत ३० वर्ष भाजपचे आमदार,राज्याचे आदिवासी विकासमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भिवंडी ग्रामीण व विक्रमगड भागातील जनतेची कामे केली.तसेच भाजपची विचारधारा गाव -खेड्यात पोहोचवून पक्ष बळकटीचे कार्य केले आहे.त्यांच्या जनसेवेचा वसा त्यांची दोन मुले डाॅ.हेमंत सवरा व मुलगी निशा सवरा हे चालवत आहेत.
यावेळी पालघर लोकसभेचे खा.डाॅ.हेमंत सवरा,जेष्ठ नेते बाबाजी काठोळे,जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

