दीपक मोहिते,
अशा लोकांना रस्त्यावर मोकाट फिरण्याचा अधिकार नाही, – सर्वोच्च न्यायालय,
डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दात ताशेरे ओढले आहेत.
“अशा लोकांना रस्त्यावर मोकाट फिरण्याचा अधिकार नाही,” असे न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने स्पष्ट शब्दांत म्हटले आहे.” वैद्यकीय क्षेत्राचा आदर न करणाऱ्यांना जामीन मिळू नये,” डॉक्टर, त्यातही महिला डॉक्टरवर जमावाने केलेल्या हल्ल्याचा मानसिक धक्का काय असतो, याची कल्पना करा, असे खंडपीठ म्हणाले.उच्च न्यायालयाने सुओ-मोटो दखल घेऊन जामीन स्थगित करणे ” पूर्णपणे योग्य होते,” असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
राज्य सरकारच्या याचिकेवर न्यायालयाने म्हात्रे यांना नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर मागितले आहे. पुढील सुनावणी २८ सप्टें.२०२६ रोजी होणार आहे.
६ जुलै रोजी शास्त्रीनगर रुग्णालय, डोंबिवली येथे उपचारात उशीर झाल्याच्या कारणावरून म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांनी डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप आहे. कनिष्ठ न्यायालयाने जामीन दिला होता, पण उच्च न्यायालयाने तो स्थगित करून नंतर गोव्याबाहेर राहण्याच्या कडक अटींवर जामीन दिला होता.
तसेच तीन दिवसापूर्वी पालघरमध्येही डॉक्टरांवर हल्ल्याची दुसरी घटना घडल्याचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने काल झालेल्या सुनावणी दरम्यान केला.त्यामुळे रमेश म्हात्रे यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

