Author: दीपक मोहिते

अभिजित पाटील,वसई, क्रीडाज्योतीचे माजी आ.क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते प्रज्वलन, ३५ व्या वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाची क्रीडाज्योत आज विरार पूर्व येथून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून माजी आ.क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली.यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष काशिनाथ पाटील,स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत राऊत,माजी नगरसेवक विलास चोरगे,माजी नगरसेवक सदानंद पाटील निषाद चोरगे,राजन पोतदार आदी उपस्थित होते.ही ज्योत दुपारी २:३० वाजता कला क्रीडा मोहोत्सवाचा संदेश देत वसई तालुक्यात फिरून शेवटी महोत्सव असलेल्या नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर जाणार आहे.क्रीडा ज्योत वसई ॲडव्हेंचर फाउंडेशनचे धावपट्टू व मोटार सायकलस्वार घेऊन जाणार धावणार आहेत. क्रीडा ज्योतीचा मार्ग विरार पूर्व रेल्वे फाटक – स्वातंत्र्यवीर…

Read More

नवीन पाटील,सफाळे, नववर्षाच्या स्वागताचा होणार जल्लोष,रिसॉर्ट्स हाऊसफुल्ल, पालघर जिल्हातील किनारपट्टीचा भाग हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असून, केळवे,शिरगाव,बोर्डी,डहाणू नरपड अर्नाळा येथील समुद्रकिनारा तसेच माकूणसार,दातीवरे,दांडा खटाळी,मनोर व विक्रमगड तालुक्यातील रिसॉर्टवर पर्यटकांची गर्दी होऊ लागल्याने गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पर्यटकांचा ओघ या पर्यटनस्थळाकडे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे पालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळाकडे रस्ते मार्गाने पर्यटक येण्यास धजावत नसत.पावसाळ्यामध्ये साधारण दोन अडीच तासाच्या प्रवासासाठी चार ते पाच तास लागत होते.त्यामुळे पर्यटकांची संख्या पालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांपासून रोडावली होती.मात्र आता या मार्गात सुधारणा झाल्यामुळे पर्यटक पुन्हा या येथे वळायला लागले आहेत. मुंबई,वलसाड,वापी व नाशिक भागातील पर्यटक पर्यटनाचा…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सरकारने आगीशी खेळ खेळू नये, आपल्या राज्यातील राजकीय,सामाजिक व आर्थिक स्थिती लक्षात घेता आपली वाटचाल अराजकतेच्या दिशेने सुरू झाल्याचे पावलोपावली जाणवू लागले आहे.बीड जिल्ह्यात सध्या जे काही चालले आहे,ते पाहता फडणवीस सरकार किती असंवेदनशील बनले आहे,हे दिसून येत आहे.संतोष देशमुख यांच्या हत्येला पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही पोलीस यंत्रणेला या हत्येमधील आरोपी सापडत नाहीत,हा प्रकार आगीशी खेळ करण्यासारखा आहे.आज त्या देशमुख कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेता बीडवासियांचा उद्रेक झाल्यास सरकार व पोलीस देखील त्यावर नियंत्रण मिळवू शकणार नाहीत.कारण बीडच्या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.उद्या बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात लोकप्रतिनिधींनी पोसलेले गुंड हातात…

Read More

जव्हार,प्रतिनिधी विक्रमगड येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराला सुरुवात, चिकित्सक समूहाचे एस.एस. आणि एल.एस.पाटकर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स व व्ही.पी.वर्दे कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स,गोरेगाव पश्चिम मुंबई यांच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिट २५ तर्फे छत्रपती विद्यालय,चरी बुद्रुक, ता.विक्रमगड येथे २४ ते ३० डिसे. २०२४ या कालावधीत निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील समस्यांचे निरीक्षण करून त्यावर उपाय शोधणे आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना विकसित करणे अशी आहे. शिबिरामध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सत्रे आयोजित करण्यात आली असून,विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी या माध्यमातून संधी देण्यात आली आहे.शिबिराच्या पहिल्या दिवशी प्रमुख सत्रात…

Read More

दीपक मोहिते, ” विनाशाला आमंत्रण,” राज्यसरकारच्या नव्या मद्यधोरणामुळे तरुणाई विनाशाच्या वाटेवर, आपल्या राजकीय फायद्यासाठी महायुती सरकारने गेल्या वर्षभरात विविध योजना कार्यान्वित केल्या.या सर्व योजना सवंग लोकप्रियतेच्या असून त्यावर सरकारने आजवर हजारो कोटी रु.ची उधळपट्टी केली.या उधळपट्टीमुळे राज्याच्या तिजोरीत आता खडखडाट निर्माण झाला आहे.महसुली खर्चात प्रचंड वाढ झाल्यामुळे सध्या राज्याचे आर्थिक गणित पार कोलमडले आहे.ही घडी पूर्ववत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकार विविध स्तरावर प्रयत्नाला लागले आहेत.त्यासाठी त्यांचे सरकार राज्याच्या मद्य धोरणात लवकरच बदल करण्याच्या तयारीत आहे. महसुली तूट भरून काढण्यासाठी सरकार आता १९७२ पासून बंद असलेले दारूचे परवाने मुक्त हस्ते वाटप करणार आहे.राज्यात सध्या विदेशी दारूचे सतराशे,तर देशी दारूचे तीन हजार…

Read More

वसंत भोईर,वाडा, रोगांचा प्रादुर्भावामुळे रब्बी पिकांना फटका, गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. रब्बी हंगामातील वाल,हरभरा,तीळ,भाजीपाला कलिंगड,या पिकांवर वातावरणातील बदलामुळे विविध किडींनी हल्ला केला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना कीटकनाशकाची फवारणी करावी लागत आहे.परिणामी शेतकऱ्याच्या खिशाला कात्री लागत आहे.तुर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीसह किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे,तर हरभरा पिकावर मावा अळीसह इतर किडींनी हल्ला चढवला आहे.रोगाने पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होणार असल्याचे दिसून आले आहे. ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या शेंगा काळया पडत असून हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.खरीप पिकापाठोपाठ आता रब्बी पिकेही धोक्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच हरभऱ्याला बुरशीची…

Read More

वसंत भोईर,वाडा, दगडखाणींतील स्फ़ोटामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, तालुक्यातील डोंगस्ते ते गावाला दगड खदानींचा विळखा पडला आहे.येथील दगड खदानीचे मालक खदानींमध्ये सतत बोअर प्लास्टिक करत असल्याने या गावातील नागरिकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.सतत होणाऱ्या स्फोटाने ग्रामस्थांच्या घरांना हादरे बसून घरांच्या भिंतींना तडा जाऊन घरांचे मोठे नुकसान झाले आहे.सदर नुकसानीची भरपाई देऊन राजरोसपणे सुरू असलेली बोर ब्लास्टिंग कायम स्वरूपी बंद करण्याची मागणी धर्मवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पष्टे यांनी तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. डोंगस्थे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मे.सी. स्क्वेअर कंपनी लिमिटेड,( कॅप्टन इन्फ्रा लिमिटेड) मे. गुरुकृपा इंटरप्राईजेस,या क्रशर व्यवसायिकांकडून सातत्याने दिवस-रात्र बरोबर ब्लास्टींग करण्यात येत असल्यामुळे ग्रामस्थांच्या घरांची नासधूस होऊन मोठे…

Read More

दीपक मोहिते, कला क्रीडा महोत्सव आयोजित फिटनेस रनला उत्स्फूर्त प्रतिसाद, वसई तालुका कला व क्रीडा विकास मंडळ,यंगस्टर ट्रस्ट आणि वसई विरार महानगरपालिका आयोजित महोत्सवाच्या पूर्वसंध्येला, ख्रिसमस सणाचे औचित्य साधून या फिटनेस रनचे आयोजन करण्यात आले होते. समाजात आरोग्य आणि तंदुरुस्तीचा संदेश देणारी, ” ख्रिसमस फिटनेस रन, ” आज नानभाट चर्च,विरार ते नरवीर चिमाजी अप्पा मैदान,वसई या मार्गावर दु.४.०० वाजता सुरु झाली.नाताळ निमित्ताने आयोजित या फिटनेस रनला मोठा प्रतिसाद मिळाला. या वेळी काश्मीर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास केलेले ज्यूड डिसोझा,सचिन कवळी,प्रणय राऊत,तसेच लडाख खारदुंगला पास येथे प्रतिकूल हवामान परिस्थितीत ७२ कि.मी.अल्ट्रा मॅरेथॉन रन पुर्ण करणारे स्वप्निल पाटील आणि जैसलमेर ते…

Read More

दीपक मोहिते, तुंगारेश्वर अभयारण्यात भ्रष्टाचाराचे जंगलराज… नरभक्षक पकडण्यासाठी जाळे लावणारे अधिकारीच भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकत असल्यामुळे तुंगारेश्वर अभयारण्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तुंगारेश्वर अभयारण्यातील भ्रष्टाचाराचा अजून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.मांडवी वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल संदीप चौरे याला काल १० लाख रु.ची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले होते.खाजगी इसमाच्या मदतीने वनजमिनीवरील बेकायदेशीर ताबा परत मिळवून देण्यासाठी ही लाच घेतल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. वन विभागातील अधिकाऱ्यांवर एकामागून एक होणाऱ्या कारवायांमुळे तुंगारेश्वर अभयारण्यातील भ्रष्टाचाराचा विषय पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.काही महिन्यांपूर्वी गोखिवरे वन परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल दिलीप तोंडे यालाही लाचलुचपत विभागाने…

Read More

जव्हार प्रतिनिधी, राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबिर संपन्न, प्रबोधन आणि सामाजिक गरजा ओळखून त्वरित उपाययोजना या विषयावर आयोजित डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निवासी शिबिर वाळवांडा गाव, जव्हार या ठिकाणी १५ ते २१ डिसें.या दरम्यान संपन्न झाले. सोलार लाईट सर्वे,धूरविरहित चुली,जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शिकवणे, युवकांसाठी मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षण, डिजिटल जनजागृती, अनेमिया आजार संदर्भात जनजागृती,आर्थिक फवणूक संदर्भात जनजागृती,शालेय जीवनात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा अशा विविध विषयावर कार्यक्रम आयोजीत केले गेले. या सोबतच विद्यार्थ्याना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.प्रो.तय्यब अली यांनी आर्थिक जनजागृती,डॉ रॉयल डिसोजा यांनी समस्या निवारण,डॉ.अविनाश अडसूळ यांचे जैव विविधता, विशाल शेंडे यांनी वारली…

Read More