दीपक मोहिते,
कला क्रीडा महोत्सव आयोजित
फिटनेस रनला उत्स्फूर्त प्रतिसाद,
वसई तालुका कला व क्रीडा विकास मंडळ,यंगस्टर ट्रस्ट आणि वसई विरार महानगरपालिका आयोजित महोत्सवाच्या पूर्वसंध्येला, ख्रिसमस सणाचे औचित्य साधून या फिटनेस रनचे आयोजन करण्यात आले होते.
समाजात आरोग्य आणि तंदुरुस्तीचा संदेश देणारी, ” ख्रिसमस फिटनेस रन, ” आज नानभाट चर्च,विरार ते नरवीर चिमाजी अप्पा मैदान,वसई या मार्गावर दु.४.०० वाजता सुरु झाली.नाताळ निमित्ताने आयोजित या फिटनेस रनला मोठा प्रतिसाद मिळाला.
या वेळी काश्मीर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास केलेले ज्यूड डिसोझा,सचिन कवळी,प्रणय राऊत,तसेच लडाख खारदुंगला पास येथे प्रतिकूल हवामान परिस्थितीत ७२ कि.मी.अल्ट्रा मॅरेथॉन रन पुर्ण करणारे स्वप्निल पाटील आणि जैसलमेर ते लोंगेवाला १८० कि.मी.ची बॉर्डर रेस २२ तासात पुर्ण करणारे प्रशांत चव्हाण,फादर लिओ फरगॉस , माजी नगरसेवक मार्शल लोपीस,हे उपस्थित होते.या कार्यक्रमामध्ये सार्थक दिब्रिटो आणि अंन्सी लोपोस यांनी ड्रॅम आणि ट्रम्पेड्वर ख्रिसमस गीताचा नजारा पेश करून उपस्थितांची मने जिंकली.या फिटनेस रन मध्ये युजीसी कॉड्रोस हे ६५ वर्षीय गृहस्थ पहिल्या फिटनेस रन स्पर्धेपासून सहभागी होत आले आहेत,तर गेल्या वर्षी प्रथमच या फिटनेस रन मध्ये सहभागी झाआलेल्याअ प्रतीक्षा चोरमले,ही त्यातून स्फूर्ती घेऊन प्रथमच वसई विरार महापालिका मॅरॅथॉन मध्ये सहभागी झाली व तिने तिच्या वयोगटात तिसरा क्रमांक मिळवला होता.आरंभ नानभाट चर्च,नाळे वाघोली-निर्मळ,भुईगाव फाटा- गिरिज चर्च,गण नाका देवतलाव-यासळई,मर्सिस चर्च,होळी बाजार- रमेदी चर्च,शनि मंदिर पारनाका सागरशेत,मुळगाव चर्च , केरपोंडे-किरवली नाका , किरवली वेलंकनी माता सेंटर , चोबारे – कृपा फाउंडेशन चर्च , पापडी नाका-पापडी चर्च, तामतलाव – नरवीर चिमाजी आप्पा मैदान वसई येथे संपन्न झाली.या फिटनेस रन मध्ये ३० धावपट्टू आणि २५ सायकलस्वार सहभागी झले होते. या फिटनेस रन कार्यक्रमाचे सूत्र संचलन सिद्धेश वर्तक यांनी केले तर प्रणय चोधरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
या कार्यक्रमासाठी वसई कला क्रीडा विकास मंडळाचे मकरंद सावे,सुमुख हळबे,क्षितिज म्हात्रे व इतर मान्यवर उपस्थित होते.

