जव्हार प्रतिनिधी,
राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबिर संपन्न,
प्रबोधन आणि सामाजिक गरजा ओळखून त्वरित उपाययोजना या विषयावर आयोजित डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निवासी शिबिर वाळवांडा गाव, जव्हार या ठिकाणी १५ ते २१ डिसें.या दरम्यान संपन्न झाले.
सोलार लाईट सर्वे,धूरविरहित चुली,जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शिकवणे, युवकांसाठी मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षण, डिजिटल जनजागृती, अनेमिया आजार संदर्भात जनजागृती,आर्थिक फवणूक संदर्भात जनजागृती,शालेय जीवनात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा अशा विविध विषयावर कार्यक्रम आयोजीत केले गेले.
या सोबतच विद्यार्थ्याना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.प्रो.तय्यब अली यांनी आर्थिक जनजागृती,डॉ रॉयल डिसोजा यांनी समस्या निवारण,डॉ.अविनाश अडसूळ यांचे जैव विविधता, विशाल शेंडे यांनी वारली चित्रकला, श्री मेकेंझी डाबरे यांचे गोबल वॉर्मिग,यावर तर इग्नेशस डायस यांनी वेळेचे व्यवस्थापन या विषासंदर्भात मार्गदर्शन केले.दररोज सकाळी योगा,श्रमदान शिबीर, झाडांना रंगरंगोटी व सुशोभीकरण असे अनेक उपक्रम राबविले गेले.
सदर शिबिरात डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविदयाचे प्राचार्य डॉ.सुधाकर मांडे,मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी श्री रमेश देवकर यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.
सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचारी व प्राध्यापक वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.यामध्ये दीपक खाके,जॅक्सन, प्रा. दिव्यानी,मोहन राणे,प्रा. माधवी पेडणेकर,अनिता यांनी सहकार्य केले. सदर शिबिरासाठी परवानगी देणारे वाळवंडा गावाचे सरपंच ऍड.वैजल,ग्रामपंचायत समितीचे सहकार्य लाभले.
सदर शिबिरात एकूण ४८ मुला मुली सहभागी झाल्या होत्या. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविदयालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.रॉयल डिसोजा यांनी मोलाचे सहकार्य केले.

