वसंत भोईर,वाडा,
दगडखाणींतील स्फ़ोटामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात,
तालुक्यातील डोंगस्ते ते गावाला दगड खदानींचा विळखा पडला आहे.येथील दगड खदानीचे मालक खदानींमध्ये सतत बोअर प्लास्टिक करत असल्याने या गावातील नागरिकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.सतत होणाऱ्या स्फोटाने ग्रामस्थांच्या घरांना हादरे बसून घरांच्या भिंतींना तडा जाऊन घरांचे मोठे नुकसान झाले आहे.सदर नुकसानीची भरपाई देऊन राजरोसपणे सुरू असलेली बोर ब्लास्टिंग कायम स्वरूपी बंद करण्याची मागणी धर्मवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पष्टे यांनी तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
डोंगस्थे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मे.सी. स्क्वेअर कंपनी लिमिटेड,( कॅप्टन इन्फ्रा लिमिटेड) मे. गुरुकृपा इंटरप्राईजेस,या क्रशर व्यवसायिकांकडून सातत्याने दिवस-रात्र बरोबर ब्लास्टींग करण्यात येत असल्यामुळे ग्रामस्थांच्या घरांची नासधूस होऊन मोठे नुकसान झाले आहे.शिवाय जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या स्फोटांमुळे मुले,वयोवृद्ध झोपेतून ओरडून उठत आहेत. सततच्या स्फोटाच्या आवाजाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे.त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान हे होत आहे.तरी प्रशासनाने याची दखल घेऊन या दगड खदानीमध्ये होणारी बोअर ब्लास्टिंग बंद करावी.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धर्मवीर विचार मंचाने दिला आहे.

