वसंत भोईर,वाडा,
रोगांचा प्रादुर्भावामुळे
रब्बी पिकांना फटका,
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
रब्बी हंगामातील वाल,हरभरा,तीळ,भाजीपाला कलिंगड,या पिकांवर वातावरणातील बदलामुळे विविध किडींनी हल्ला केला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना कीटकनाशकाची फवारणी करावी लागत आहे.परिणामी शेतकऱ्याच्या खिशाला कात्री लागत आहे.तुर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीसह किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे,तर हरभरा पिकावर मावा अळीसह इतर किडींनी हल्ला चढवला आहे.रोगाने पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होणार असल्याचे दिसून आले आहे.
ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या शेंगा काळया पडत असून हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.खरीप पिकापाठोपाठ आता रब्बी पिकेही धोक्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच हरभऱ्याला बुरशीची लागण होऊन पिक वाळत चालले आहे,त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

