दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
सरकारने आगीशी खेळ खेळू नये,
आपल्या राज्यातील राजकीय,सामाजिक व आर्थिक स्थिती लक्षात घेता आपली वाटचाल अराजकतेच्या दिशेने सुरू झाल्याचे पावलोपावली जाणवू लागले आहे.बीड जिल्ह्यात सध्या जे काही चालले आहे,ते पाहता फडणवीस सरकार किती असंवेदनशील बनले आहे,हे दिसून येत आहे.संतोष देशमुख यांच्या हत्येला पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही पोलीस यंत्रणेला या हत्येमधील आरोपी सापडत नाहीत,हा प्रकार आगीशी खेळ करण्यासारखा आहे.आज त्या देशमुख कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेता बीडवासियांचा उद्रेक झाल्यास सरकार व पोलीस देखील त्यावर नियंत्रण मिळवू शकणार नाहीत.कारण बीडच्या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.उद्या बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यात लोकप्रतिनिधींनी पोसलेले गुंड हातात रिव्हॉल्वर घेऊन हैदोस घालत असतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात वायरल होत आहेत.त्यांच्या दहशतीचे किस्से सतत कानावर पडत आहेत,पण पोलिसांना देशमुख हत्येमधील आरोपीचा शोध लागत नाही.जिल्ह्यातील वातावरण शांत झाल्यानंतर हे आरोपी कोणाच्या तरी मदतीने स्वतःहून हजर होतील,अशी शक्यता आहे.ते हजर झाल्यानंतर पोलीस ” त्यांच्या मोबाईल लोकेशनवरून त्यांना आम्ही हुडकून काढले,असे जाहीर करत आपली पाठ थोपटून घेतील.गेल्या काही वर्षात असे अनेक प्रकार घडले आहेत.त्यामुळे तसं घडल्यास,आपण आश्चर्य वाटून घेता कामा नये.जनता सहनशील आहे,पण त्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला की भली भली साम्राज्ये काळाच्या ओघात नाहीशी झाल्याचे आपल्याला इतिहासात पाहायला मिळाले आहे.जे महायुतीच्या काळात घडतंय ते जर महाविकास आघाडीच्या काळात घडले असते,तर भाजपने रान उठवले असते.पण आज त्यांचे सरकार असताना बदलापूर बलात्कार,पुण्यासारख्या विद्येचे माहेरघर असलेल्या शहरात सुरू असलेल्या कोयता गँगचा हैदोस,बीड जिल्ह्यात सुरू असलेले रिव्हॉल्व्हर राज,परभणी शहरात सूर्यवंशीची पोलीस कोठडीत झालेली हत्या व याव्यतिरिक्त आजवर अनेक घटना घडल्या,पण सरकार म्हणून फडणवीस यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही.त्यांनी परभणी व बीड येथे जाऊन सूर्यवंशी व देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले असते,तर सरकारची शान राहिली असती.पण ज्या शरद पवार यांनी आपले कर्तव्य पार पाडले,त्यावर फडणवीस महाशय,” विरोधक या घटनेचे राजकारण करत आहेत,” अशी टीका करण्यास सुरुवात केली.या दोन्ही ठिकाणी त्यांनी अधिकार नसलेल्या मंत्र्यांना पाठवले,ते आले,देशमुख व सूर्यवंशी कुटुंबीयांशी बोलले व आल्यापावली परतले.यालाच आपण असंवेदनशील कारभार म्हणतो.या प्रकरणात जो ” आका,” तुमच्या मंत्रिमंडळात आहे,त्याला हात लावण्याची हिंमत नाही.” तुमचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन ” आम्ही गुन्हेगारांना सोडणार नाही,” अशी राणा भीमदेवीच्या थाटात घोषणा केली.पण हा आका,मंत्रिमंडळात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतो,हे त्या माऊलीला व देशमुखांच्या मुलीला कुठे माहित आहे.त्यामुळे सरकारच अराजकाला आमंत्रण देत आहे,असं म्हटल्यास ते चुकीचे होणार नाही.देशमुख व सूर्यवंशी या दोन कुटुंबांना न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या काळात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.बीडमध्ये उद्या सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या मोर्चाची हवा काढण्याचा प्रयत्न फडणवीस सरकारकडून होईल,असा अंदाज आहे.आज संध्याकाळी किंवा रात्री सरकार,या “आका,” ला व त्याच्या साथीदारांना अटक करतील,असा अंदाज आहे.कारण अशाप्रकारची कामे करण्यात या सरकारचा हात कोणी पकडू शकत नाही.