अभिजित पाटील,वसई,
क्रीडाज्योतीचे माजी आ.क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते प्रज्वलन,
३५ व्या वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाची क्रीडाज्योत आज विरार पूर्व येथून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून माजी आ.क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली.यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष काशिनाथ पाटील,स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत राऊत,माजी नगरसेवक विलास चोरगे,माजी नगरसेवक सदानंद पाटील निषाद चोरगे,राजन पोतदार आदी उपस्थित होते.ही ज्योत दुपारी २:३० वाजता कला क्रीडा मोहोत्सवाचा संदेश देत वसई तालुक्यात फिरून शेवटी महोत्सव असलेल्या नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर जाणार आहे.क्रीडा ज्योत वसई ॲडव्हेंचर फाउंडेशनचे धावपट्टू व मोटार सायकलस्वार घेऊन जाणार धावणार आहेत.
क्रीडा ज्योतीचा मार्ग विरार पूर्व रेल्वे फाटक – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा – मोरया नगर – मनवेलपाडा रोड – मनवेल पाडा – तुळींज – आचोळे रोड – सोपारा वसंत नगरी लिंक रोड – फायर स्टेशन – वसंत नगरी – रेल्वे फ्लाय ओवर पूर्व – पंचवटी नाका – अंबाडी रोड – माणिकपूर ग्राउंड – माणिकपूर नाका – भाबोळा नाका- पापडी – तामतलाव – एसटी स्टँड वसई – चिमाजी अप्पा मैदान असा असणार आहे.ही क्रीडाज्योत वसई ॲडव्हेंचर फाउंडेशनचे विजय चौधरी,पंकज वर्तक,शशांक वर्तक,ज्यूड डिसोजा,लक्ष्मीकांत पाटील, परेश चौधरी,राकेश चौधरी, गौरव राऊत,राजू देशमुख, रितेश वर्तक,समीर चौधरी,मीत वर्तक,हर्ष वर्तक,निलय वर्तक व सोहम चौधरी हे घेऊन चिमाजी आप्पा मैदानाकडे रवाना झाले.

