- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, राज्यात राजकीय भूकंप होण्याचे संकेत ; कोंडी होऊनही ईडीच्या भितीने शिंदे गट महायुतीमध्ये, संजय राऊतांनी काल सायंकाळी केलेल्या पोस्टमध्ये एक बकरा लाकडावर उभा असल्याचं पाहायला मिळत आहे.राऊत यांनी या पोस्टमध्ये बकऱ्याचा फोटो अटॅच करुन, ” खबर पता चली क्या ?” अशी चार शब्दांची कॅप्शन दिली आहे.तसेच त्यांनी या पोस्टच्या खाली, ” ए. सं.शिं. गट…” असं लिहिलेलं आहे.संजय राऊत हे सामान्यपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या शिवसेनेचा शिंदेंच्या नावाच्या अद्याक्षरांवरुन ” ए.सं.शिं. गट,” असा उल्लेख करतात. त्यावरुनच त्यांनी पोस्ट केलेला हा फोटो एकनाथ शिंदेंना डिवचण्यासंदर्भात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राऊत यांच्या या पोस्टवरुन तर्क-वितर्क लढवले जात असतानाच त्यांनी ही पोस्ट…
वसंत भोईर,वाडा चांबळ्याचा देशी पांढरा कांदा बाजारात दाखल, ज्या कांद्याची दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस आतुरतेने वाट पाहिली जाते,असा औषधी गुणधर्म असलेला वाडा तालुक्यातील चांबळे येथील प्रसिद्ध पांढरा कांदा बाजारात दाखल झाला आहे. कांदा माळा बनवून विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाला आहे. दोन किलो वजनाची एक माळ १३० रु.प्रमाणे विक्री करण्यात येत आहे. अनेक संकटावर मात करत जांभळा गावातील शेतकऱ्यांनी यावर्षी पांढरा कांदा मोठ्या प्रमाणात पिकवला आहे. भात पीक कापणी झाल्यानंतर पांढरा कांदा लागवडीला सुरुवात होते. वाडा तालुक्यात चांबळा, डाकवली,असनस,चिखला, गातेस,केळठण या काही मोजक्याच गावात पांढऱ्या कांदा लागवड करण्यात येत असते.पोषक वातावरण आणि पारंपारिक लागवड,यामुळे आजही पांढरा कांदा आपले औषधी गुणधर्म टिकवून…
दीपक मोहिते, तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका भाजप व अण्णाद्रमुक एकत्रितपणे लढणार, अण्णाद्रमुकचे सरचिटणीस एडापाडी के.पलानीस्वामी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचे जाहीर केले आहे.त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षाचा सुपडा साफ झाला होता.दक्षिणेकडील एकाही राज्यात भाजप स्वबळावर निवडणूक लढवू शकत नाही.त्यांना दक्षिणेत बिलकुल जनाधार नाही.त्यामुळे भाजप स्थानिक प्रादेशिक पक्षाशी हातमिळवणी करत असतात. अण्णाद्रमुकने घेतलेला हा निर्णय त्यांच्यासाठी आत्माघाती ठरण्याची शक्यता आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांना एकही जागा जिंकता आल्या नव्हत्या.उलट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व द्रमुक यांच्या युतीला मोठा विजय मिळाला होता.या निवडणुकीत द्रमुकला २६.९३,अण्णा…
दीपक मोहिते, राज्याच्या अर्थखात्याच्या कारभाराविषयी मंत्र्यामध्ये असंतोष, एखाद्या कॅबिनेटमंत्र्याने आपल्या अखत्यारीत असलेल्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन मिळावे,यासाठी कटोरा घेऊन अर्थखात्याच्या प्रधान सचिवांच्या दारात जावे लागणे,ही बाब महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला शोभेशी नाही,तसेच ती लाजिरवाणी अशीच आहे. राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सध्या चांगलीच धावपळ होत आहे.सरनाईक हे राजशिष्टाचार मोडून अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांच्या भेटीला गेले.सचिवानं मंत्र्याला भेटण्यासाठी यावं,असा राजशिष्टाचार आहे.मात्र एसटी कर्मचाऱ्यांसाठी सरनाईकांनी राजशिष्टाचार मोडून ते अर्थ खात्याच्या सचिवांच्या भेटीला गेले. अर्थखात्याच्या सचिवांची भेट घेतल्यानंतर,आता एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी १४४ कोटी रु.सरकारकडून तातडीनं देण्यात येणार आहेत. तसेच यापुढे एक महिना आधीच निधी एसटी महामंडळाला दिला जाणार आहे.एसटी कर्मचाऱ्यांचा पगार…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आम्हाला फोटोशूट नकोय ; पाणी हवंय – ग्रामस्थांचा आक्रोश, कासा येथे जाऊन रोहित्र लोड करत असताना समोर उभे राहून फोटोशूट करण्याने कामण,चिंचोटी,देवदळ, भागातील गोरगरीब जनतेची तहान भागवता येणार नाही.त्यासाठी स्वतःच्या सरकारच्या उरावर बसण्याची हिंमत दाखवण्याची गरज आहे. आज वसई,नालासोपारा या परिसरात पाणीटंचाई तीव्र स्वरूपात जाणवू लागली आहे.ग्रामीण भागातील जनतेच्या घश्याला कोरड पडली आहे.ज्या पाण्याच्या प्रश्नावर रान उठवत आमदार निवडून आले आहेत,ते आमदार सध्या फोटोशूटमध्ये मग्न आहेत.निवडणुकीच्या प्रचारात ” आम्ही लवकरात लवकर पाणी आणू,” अशा सिंहगर्जना करणारे तथाकथित नेते आता केवळ आश्वासने देण्यात धन्यता मानत आहेत.दुसरीकडे टँकर लॉबीनेही टँकरचे भाव भरमसाठ वाढवल्यामुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आला…
दीपक मोहिते, पालघर जिल्ह्यात मराठी माणूस अल्पसंख्यांक होण्याच्या मार्गावर… परराज्यातून मुंबई,ठाणे व पालघर जिल्ह्यात स्थलांतरीत होणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्यात स्थानिक भूमिपुत्राच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.ज्या प्रचंड वेगाने हे स्थलांतरण होत असल्यामुळे वसई,नालासोपारा,बोईसर भागात मराठी माणूस आता अल्पसंख्याक होण्याच्या मार्गावर आहे. नुकत्याच पार पडलेल्या वरील तीन विधानसभा मतदारसंघात परप्रांतियांच्या मतदानामुळे जिल्ह्याच्या निवडणुकीचे चित्रच बदलून टाकले.या निवडणुकीत परप्रांतियांची मते निर्णायक ठरली होती.पालघर जिल्ह्यात १९७० च्या दशकात उद्योग व कारखानदारीला वेग आला.तारापूर-बोईसर भागात महा.औद्यो.विकास महामंडळ तसेच वसई भागात लघुउद्योगाला चालना मिळाली,आणि रोजगारानिमित्त या भागात स्थलांतरित होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत गेली.कालांतराने बाहेरून येऊन येथे स्थायिक होणाऱ्या परप्रांतियांची वाढती…
दीपक मोहिते, ” वास्तव, ” गेले अकरा वर्ष,कालचक्र उलट्या दिशेने फिरत राहिले, काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दिवसेंदिवस आक्रमक होत असल्यामुळे मोदीना आता त्यांची भिती वाटू लागली आहे.अधिवेशनात राहुल गांधी,प्रियांका गांधी व त्यांच्या टीमने भारतीय संविधान, वक्फ बोर्ड,वाढती महागाई, बेरोजगारी,रुपयाचे अवमूल्यन,अरुणाचल व लडाख भागात चीनची होणारी घूसखोरी,आदी ज्वलंत विषयावर संसदेत प्रखर हल्ले चढवले.या हल्ल्याना मोदी,अमित शहा यांची टीम समर्थपणे तोंड देऊ शकले नाही.या अधिवेशनात सरकार बॅकफुटवर गेल्याचे पाहायला मिळाले. येत्या १४ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सत्तेची अकरा वर्षे पूर्ण करून बाराव्या वर्षात पदार्पण करत आहे.या एक तपाच्या वाटचालीत ते भारताला काँग्रेसमुक्त करू शकले नाहीत.उलट…
महिलांना प्रवास तिकीट दरात ५०% सवलत मिळावी- आ.स्नेहा दुबे वसई विरार शहर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमधुन प्रवास करणाऱ्या महिलांना राज्य शासनाच्या धोरणानुसार प्रवास तिकीट दरात ५०% सवलत देण्याची मागणी आ.स्नेहा दुबे पंडित यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी नुकतीच आयुक्त पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. महाराष्ट्र शासनाने एस.टी. महामंडाळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५०% सवलत जाहीर केली असून महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. तसेच एम.एम.आर.डी.ए क्षेत्रातील ठाणे व नवी मुंबई महानगरपालिका प्राधिकरणानेही अशी सवलत देण्यास सुरुवात केली आहे, असे असताना आपल्या वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना अद्याप ही सवलत अद्याप दिली नाही, याकडे आयुक्तांचं लक्ष…
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे ” सुंदर पालघर जिल्हा,” अभियानाचा शुभारंभ, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून“प्लास्टिकमुक्त, दुर्गंधीमुक्त आणि सुंदर पालघर जिल्हा हे विशेष अभियान जिल्ह्यात गत २८ मार्च २०२५ रोजी सुरू करण्यात आले. या अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ आज ११ एप्रिल २०२५ रोजी जव्हार तहसील कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत, लोकनियुक्त सरपंच संघटना अध्यक्ष एकनाथ दरोडा,सरपंच संदीप माळी, सरपंच कल्पेश राऊत, सरपंच सुदाम उंबरसाडा ,महिला सरपंच सुनंदा घाटाळ व विविध विभागांचे…
सचिन परब,विरार विरार पूर्व कारगिल नगर येथे रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार, स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार वसई विरार शहर महानगरपालिकेकडून कारगिल नगर रिक्षा स्टँड ते जयदीप हायस्कूलपर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे,या कामासाठी अंदाजपत्रकीय रु.५८ लाख ५१ हजार १७/– इतका निधी उपलब्ध झाला आहे. या कामास आयुक्तानी ८ जाने. २०२५ रोजी मंजुरी दिल्यानंतर या कामाचा शुभारंभ काल श्रीफळ वाढवून करण्यात आला.याप्रसंगी माजी नगरसेवक प्रशांत राऊत,माजी नगरसेविका चिरायु चौधरी, माजी नगरसेविका मीनल पाटील,संगीता भेरे,हेमांगी पाटील व स्थानिक बहुजन विकास आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते,संबंधित ठेकेदार,रहिवासी उपस्थित होते.
