दीपक मोहिते,
” वास्तव, ”
गेले अकरा वर्ष,कालचक्र उलट्या दिशेने फिरत राहिले,
काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दिवसेंदिवस आक्रमक होत असल्यामुळे मोदीना आता त्यांची भिती वाटू लागली आहे.अधिवेशनात राहुल गांधी,प्रियांका गांधी व त्यांच्या टीमने भारतीय संविधान, वक्फ बोर्ड,वाढती महागाई, बेरोजगारी,रुपयाचे अवमूल्यन,अरुणाचल व लडाख भागात चीनची होणारी घूसखोरी,आदी ज्वलंत विषयावर संसदेत प्रखर हल्ले चढवले.या हल्ल्याना मोदी,अमित शहा यांची टीम समर्थपणे तोंड देऊ शकले नाही.या अधिवेशनात सरकार बॅकफुटवर गेल्याचे पाहायला मिळाले.
येत्या १४ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सत्तेची अकरा वर्षे पूर्ण करून बाराव्या वर्षात पदार्पण करत आहे.या एक तपाच्या वाटचालीत ते भारताला काँग्रेसमुक्त करू शकले नाहीत.उलट राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ” अबकी बार ४०० पार,” या त्यांच्या स्वप्नाचे अक्षरशः ठिकऱ्या उडवल्या व त्यांना २४० वर आणून ठेवले.ज्या राहुल गांधी यांना त्यांनी कायम ” पप्पू,” म्हणून हिणवले,त्याच राहुल गांधी यांची टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्र्यांची संसदेत पिसं काढत आहेत.सुमारे ४ हजार की.मी.अखंड चालत त्यांनी भारत जोडो यात्रा काढली व मोदींना संदेश दिला की ” नफरतकी दुकान बंद करो, और भारत जोडो.” राहुल गांधी यांच्या या भारत जोडो यात्रेत लाखो लोक सामील झाले होते आणि लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ८ हजार कोटी रू.चे जमिनीवर आपटले.दीड कोटी रु.चा कोट वापरणाऱ्या मोदी यांनी राहुल गांधी यांच्या टी शर्टवर खालच्या थराला जाऊन टीका केली,पण त्याच राहुल गांधी यांनी मोदी-शहा या दोघांच्या लोकसभा निवडणुकीत पाणी पाजले.आज संसदेत राहुल गांधी यांच्या टीमने त्यांच्या मंत्र्यांची ” पळता भुई थोडी,” केली आहे.जग चंद्रावर पोहोचले असताना आपले सरकार
औरंगजेबाची कबर खोदण्यात मग्न आहे.नोकऱ्या मिळत नसतील तर गटारांतुन येणाऱ्या गॅस वर पकोडे तळा, असा सल्ला युवकांना देण्यात मोदी धन्यता मानत आहेत.सरकार सर्व आघाडीवर अपयशी ठरले असुन ज्या दिवशी तेलूगू देशमचे चंद्राबाबू नायडू व जेडीयुचे नितिश कुमार त्यांच्या पायाखालची चादर खेचतील,त्या दिवशी मोदी – शहा यांच्या डोळ्यासमोर काजवे चमकतील.मोदी यांनी अमेरिकेत जाऊन ट्रम्प यांना आजवर मारलेल्या मिठ्या झिडकारत आपल्यावर २६ % टॅरिफ लादला आहे.पण आपले विश्वगुरु काहीही करू शकले नाही.अमेरिकेत जाऊन ” अबकी बार ट्रम्प सरकार,” कोकलणाऱ्या नेत्यांना ट्रम्प यांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे.अशा सर्व परिस्थितीत मोदी सरकार येत्या १४ मे रोजी बाराव्या वर्षात प्रवेश करत आहेत.पण या वाटचालीला आपण यशस्वी वाटचाल म्हणू शकत नाही.आपण मागे वळून पाहिले तर आपण मागील अकरा वर्षात खूप काही गमावल्याचे दिसून येते. ” अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी,असहिष्णूता,धार्मिक तेढ,हिंसक दंगली,समाजा – समाजात फुट,प्रचंड महागाई, याचे आपण धनी झाल्याचे पाहायला मिळते.

