सचिन परब,विरार
विरार पूर्व कारगिल नगर येथे रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार,
स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार वसई विरार शहर महानगरपालिकेकडून कारगिल नगर रिक्षा स्टँड ते जयदीप हायस्कूलपर्यंत रस्त्याचे खडीकरण व
डांबरीकरण करणे,या कामासाठी अंदाजपत्रकीय रु.५८ लाख ५१ हजार १७/– इतका निधी उपलब्ध झाला आहे.
या कामास आयुक्तानी ८ जाने. २०२५ रोजी मंजुरी दिल्यानंतर
या कामाचा शुभारंभ काल श्रीफळ वाढवून करण्यात आला.याप्रसंगी माजी नगरसेवक प्रशांत राऊत,माजी नगरसेविका चिरायु चौधरी, माजी नगरसेविका मीनल पाटील,संगीता भेरे,हेमांगी पाटील व स्थानिक बहुजन विकास आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते,संबंधित ठेकेदार,रहिवासी उपस्थित होते.

