जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे ” सुंदर पालघर जिल्हा,” अभियानाचा शुभारंभ,
महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून“प्लास्टिकमुक्त, दुर्गंधीमुक्त आणि सुंदर पालघर जिल्हा हे विशेष अभियान जिल्ह्यात गत २८ मार्च २०२५ रोजी सुरू करण्यात आले. या अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ आज ११ एप्रिल २०२५ रोजी जव्हार तहसील कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत, लोकनियुक्त सरपंच संघटना अध्यक्ष एकनाथ दरोडा,सरपंच संदीप माळी, सरपंच कल्पेश राऊत, सरपंच सुदाम उंबरसाडा ,महिला सरपंच सुनंदा घाटाळ व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, तसेच जव्हार तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते यांनी या अभियानाची प्रस्तावना सादर करत उद्दिष्टे व अंमलबजावणी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर विविध योजनांवर विषयतज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.यामध्ये
संतोष रजपूत यांनी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २, तालूका पेसा समन्वयक आशा शिंदे यांनी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये माझी वसुंधरा अभियान ५.० करावयाची कामे याविषयी मार्गदर्शन केले.व आकांक्षीत तालूका कार्यक्रम सहकारी चेतन शेवाळे यांनी आकांक्षित तालुका योजना याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर आ. हरिश्चंद्र भोये यांनी उपस्थित सर्व सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना प्लास्टिकमुक्त,दुर्गंधीमुक्त आणि सुंदर पालघर जिल्हा हे विशेष अभियानाअंतर्गत स्वच्छतेच्या उपाययोजनांबाबत प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन संतोष रजपूत यांनी केले.

