दीपक मोहिते,
राज्यात राजकीय भूकंप होण्याचे संकेत ; कोंडी होऊनही ईडीच्या भितीने शिंदे गट महायुतीमध्ये,
संजय राऊतांनी काल सायंकाळी केलेल्या पोस्टमध्ये एक बकरा लाकडावर उभा असल्याचं पाहायला मिळत आहे.राऊत यांनी या पोस्टमध्ये बकऱ्याचा फोटो अटॅच करुन, ” खबर पता चली क्या ?” अशी चार शब्दांची कॅप्शन दिली आहे.तसेच त्यांनी या पोस्टच्या खाली, ” ए. सं.शिं. गट…” असं लिहिलेलं आहे.संजय राऊत हे सामान्यपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या शिवसेनेचा शिंदेंच्या नावाच्या अद्याक्षरांवरुन ” ए.सं.शिं. गट,” असा उल्लेख करतात. त्यावरुनच त्यांनी पोस्ट केलेला हा फोटो एकनाथ शिंदेंना डिवचण्यासंदर्भात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राऊत यांच्या या पोस्टवरुन तर्क-वितर्क लढवले जात असतानाच त्यांनी ही पोस्ट केल्यानंतर जवळपास १२ तासांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पोस्टबद्दल सूचक विधान केलं आहे.
त्या पोस्टचा अर्थ काय ? राऊत म्हणाले, “आता बस्स झालं…”
तुम्ही ट्विटरवर केलेल्या पोस्टचा अर्थ काय ? असं राऊत यांनी विचारलं असता त्यांनी, ” महाराष्ट्रातला हा एक बकरा आहे आणि तो बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे.त्या बकऱ्याला उभा केला आहे आणि सांगितलं आहे की,फार शहाणपणा केला तर मारू मारून टाकू.गप्प उभं राहून बे,बे करत राहायचं.आता बस्स झालं खूप ऐकलं तुमचं,असं दिल्लीत या बकऱ्याच्या कानात कोणीतरी सांगितलं आहे,” असं उत्तर त्यांनी दिले.
” ए.सं.शिं.” गटावरुन त्याना विचारला असता म्हणाले…
पुढे पत्रकाराने तुम्ही या पोस्टखाली ” ए.सं.शिं.गट,” असा उल्लेख केला आहे. त्यावरुन राऊतांनी पत्रकाराला, ” तुम्हाला यु.बी. टी.माहित आहे,तर ए.सं.एन.शिं.गट माहित असायला हवे,अभ्यास करा थोडा,” असा खोचक सल्ला दिला.
राजकीय भूकंप?
आता राऊतांनी केलेल्या दाव्यानुसार पुढील काही दिवसांमध्ये खरोखरच काही घडतं का ? हे पाहणं महत्त्वाचं आहे.सध्या तरी राऊतांनी दिलेल्या इशाऱ्यावरुन बकऱ्याचा हा फोटो महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपही आणू शकतो,अशी जोरदार चर्चा आहे.पण नेमकं होणार काय ? याची नेमकी कल्पना ना राऊतांनी दिली आहे ना यावर कोणी प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यामुळे पुढील २ ते ३ दिवसातील राजकीय घडामोडींचा संदर्भ राऊतांच्या या ट्वीटशी जोडला जाऊ शकतो असंही बोललं जात आहे.
काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री यांची दिल्लीत मध्यरात्री भेट घेऊन फडणवीस व त्यांची टीम मला अडचणीत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असुन मी मंजूर केलेल्या प्रकल्पाना स्थगिती देत असल्याचे त्यांना सांगितले होते.पण शहा यांनी त्यांच्या तक्रारी संदर्भात कोणतेही आश्वासन दिले नाही.यावरून शिंदे यांचे दिल्ली दरबारी वजन कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे.

