Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” लाडकी बहीण योजना,” आता गटांगळ्या खाऊ लागली आहे…. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे सुरु करण्यात आलेली ” लाडकी बहीण योजना, “आता गटांगळ्या खाऊ लागली आहे.महिलाच्या मतांवर डोळा ठेवून महायुतीने ही योजना सुरु केली.त्याचा फायदा निवडणुकीत महायुतीला फायदा झाला. पण आता या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाल्यामुळे सरकार निरनिराळॆ निकष लावून लाभार्थी महिलांची संख्या कमी करत आहेत. आतापर्यंत ९ लाख लाभार्थ्यांना सरकारने बाहेरचा रास्ता दाखवला आहे. सरकारने आता लाडकी बहीण योजनेत मोठा निर्णय घेतला असून सुमारे ८ लाख महिलांना यापुढे १५०० ऐवजी फक्त ५०० रु. मिळणार आहेत.ही योजना सुरुवातीपासूनच महिलांसाठी आर्थिक मदतीचा आधार…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महायुती सरकारच्या अनेक मंत्र्यांची कामगिरी निराशाजानक, महायुती सरकारच्या १०० दिवसातील कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयाला पाठवला आहे.सरकारमधील अनेक कॅबिनेटमंत्र्यांची कामगिरी निराशाजनक राहिल्याचे या आढाव्यात म्हंटलं आहे. यामध्ये शिंदे गटाचे दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे,दादा भुसे,उदय सामंत,संजय शिरसाट,प्रताप सरनाईक,गुलाबराव पाटील,भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे,आशिष शेलार,चंद्रकांत पाटील,गिरीश महाजन,नितेश राणे,गणेश नाईक,अतुल सावे,मंगलप्रभात लोढा,राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार,अदिती तटकरे,माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे.या सर्वांना देण्यात आलेले टार्गेट त्यांना केवळ ३० ते ४० % पूर्ण करता आले.त्यांच्या या निराशाजनक कामगिरीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असून त्यांनी या मंत्र्यांच्या परफार्मन्सबाबत केंद्रीय नेत्याकडे आपले म्हणणे स्पष्टपणे मांडले आहे.त्यामुळे पुढे होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात यापैकी…

Read More

दीपक मोहिते, प्रशासनाचा हलगर्जीपणा ; निधी निधी उपलब्ध होऊनही धुपप्रतिबंधक  बंधारा कागदावरच… वसईच्या समुद्रकिनाऱ्यावर संरक्षक बंधारा बांधून समुद्रकिनारा गिळंकृत करण्यापासून वाचवावे,अशी मागणी या समुद्रकिनारी राहणाऱ्या स्थानिक रहिवाश्यानी राज्य शासनाकडे केली आहे. सागरी जीवावर अभ्यास करणारे संशोधक भुईगाव,रानगाव समुद्र किनाऱ्याला पसंती देत असतात.पर्यटनसोबत वसईतील समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात भात,चवळी, गवार,वाल,दुधी,विविध फुलं आदी शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.पर्यटन व शेतकरीसाठी प्रसिद्ध असलेले निसर्गरम्य समुद्रकिनारे जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. केंद्र व राज्य शासनाने निसर्ग व तोते,या वादळानंतर कोकणात आपत्ती व्यवस्थापनासाठी तब्बल ४ हजार ७०० कोटी रु.मंजूर केले.त्याअंतर्गत धूपप्रतिबंधक बंधारे,पूर संरक्षक भिंत,दरड प्रतिबंधात्मक कामे, बहुउद्देशीय निवारा केंद्र,खार प्रतिबंधक बंधारे,भूमिगत विद्युत वाहिनी…

Read More

दीपक मोहिते, गुजरातच्या समुद्रात अठराशे कोटीचे ड्रग्ज पकडले, गुजरातच्या समुद्रात कोस्ट गार्ड आणि गुजरात एटिसच्या संयुक्त कारवाईत तब्बल १ हजार ८०० कोटी रु.चा ड्रग्जसाठा असणारी बोट पकडण्यात आली आहे.सुमारे ३०० कि.एमडी ड्रग्ज या बोटीतून जप्त करण्यात आले आहे.ही कारवाई महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर समुद्रात करण्यात आली आहे. नार्कोटिक्स विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,ही बोट रात्रीच्या अंधारात समुद्रातून पाकिस्तानच्या दिशेने भारतात येत होती,अशी प्राथमिक माहिती आहे.कोस्ट गार्डच्या स्पीड बोट्स आणि मोठ्या जहाजांनी सिनेमा स्टाईल कारवाई करत ही बोट थांबवली आणि तिची कसून तपासणी केली असता बोटीत मेथॅम्पेटामिन ( एमडी ड्रग्ज ) हे ड्रग्ज असल्याचं समोर आलं आहे.ही अत्यंत घातक आणि महागडी ड्रग…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” तीन इंजिन सरकारमध्ये कुरघोडीच्या राजकारणाला ऊत, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं होणं अपेक्षित होतं.मात्र त्यांना भाषणाची संधी मिळालीच नाही.अजित पवार तर राज्यापाल जाण्याआधीच कार्यक्रमातून निघून गेले.तर एकनाथ शिंदे देखील कार्यक्रमानंतर तडकाफडकी ठाण्याला निघून गेले.आपल्या नेत्याला भाषणाची संधी न मिळाल्यानं शिंदे समर्थक देखील नाराज झाले आहेत. ऐनवेळी कार्यक्रमाच्या नियोजनात कोणी बदल केला हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नुकतेच महाराष्ट्रातील रायगड दौऱ्यावर आले होते.याआधी एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांची भेट घेतली.एकनाथ शिंदे यांनी रविवारी सकाळी अमित शाह यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली होती.यावेळी एकनाथ शिंदे…

Read More

दीपक मोहिते, ” सत्तेचा मार्ग स्वार्थातून जातो,”आणखी एक घराणे स्वार्थापोटी दुभंगले, सत्ता,हे सुख व ऐश्वर्य भोगण्याचे साधन आहे,त्यामुळे राज्यातील अनेक नामवंत घराणी गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय आहेत.त्यामध्ये ठाकरे,मुंडे,पवार,गांधी, राणे,विजय सिंह मोहिते पाटील,वसंत दादा पाटील व इतर अनेक घराणीचा त्यामध्ये समावेश आहे.पण या सर्व घराणींना आता फुटीचे ग्रहण लागायला सुरुवात झाली आहे.सत्तेचा हव्यास व स्वार्थापोटी ही सर्व घराणी आता दुभंगत चालली आहेत.ही घराणी फुटल्यानंतर त्यांना फायदा होत नाही,पण वर्षानुवर्षे हाती असलेली सत्ता गमावण्याची नामुष्की मात्र त्यांच्यावर आली.राज्याच्या सत्तेच्या राजकारणात अशी एक ना अनेक उदाहरणे पाहायला मिळतात.पण त्यातून कोणी शहाणा व्हायला तयार नाही.या घराण्यातील प्रत्येकाला ” मला का नाही,” एकाच प्रश्नाने…

Read More

वसंत भोईर,वाडा वैश्य समाज संघाचा वधु – वर मेळावा उत्साहात संपन्न, मंगला हॉल कोपरी ठाणे येथे काल पालघर महाराष्ट्र वैश्य समाज संघाचा वधु वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ठाणे पालघर तसेच रायगड व नाशिक जिल्ह्यातील अनेक वधू वर मोठ्या उपस्थित होते.३२व्या वधू वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष सीमाताई महाजन,जिल्हा संघाचे अध्यक्ष निलेशजी गंधे,समन्वय समिती प्रमुख दिलीप भोपतराव, रायगड जिल्हा वैश्य समाजाचे अध्यक्ष अशोक भोपतराव, उपाध्यक्ष प्रीयेश जगे निलेश कोंडलेकर जिल्हा महिला प्रतिनिधी पूजा काबाडी, जिल्हा उप महिला प्रतिनिधी मयुरी तोंडलीकर, समितीचे सभापती निमेष खडकबाण,चिटणीस, सह चिटणीस,विश्वस्त,सल्लागार, माजी अध्यक्ष,सभापती,गट सभापती,तसेच वधू-वर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.…

Read More

नवीन पाटील,सफाळे इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प  ; प्रवाशांचे झाले अतोनात हाल, पश्चिम रेल्वेच्या सफाळे आणि केळवे रोड रेल्वेस्थानका दरम्यान बिकानेर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने आज दुपारी साधारण साडेतीन ते चारच्या सुमारास गुजरातकडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. पश्चिम रेल्वेकडून इंजिनमधील बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाल्यानंतर अर्धा तासाच्या विलंबानंतर रेल्वेसेवा पूर्ववत झाली.पश्चिम रेल्वेच्या डहाणू व गुजरातच्या दिशेने धावणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवांसह लांब पल्ल्याच्या सेवा आज दुपारी अर्धातास ठप्प झाल्या होत्या.भर दुपारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे प्रवासी संतप्त झाले होते. गुजरातकडे जाणाऱ्या बिकानेर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये सफाळे ते केळवा रोड स्थानकाच्या दरम्यान अचानक बिघाड झाल्यामुळे ती जागीच थांबून…

Read More

जव्हार प्रतिनिधी सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र,जव्हार येथे रक्तदान शिबीर, सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र,जव्हार यांच्यातर्फे पतंगशाह कुटीर रुग्णालय, जव्हार येथील रक्तकेंद्र येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमात एकूण ६५ रक्तदाते सहभागी झाले.अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी वाट पाहणारे रुग्ण,गरोदर माता तसेच विविध आजारांनी त्रस्त असंख्य रुग्ण यांच्यासाठी रक्तदान हेच जीवनाचे आधारस्तंभ ठरते.त्यामुळे प्रत्येक आरोग्यदायी व्यक्तीने नियमितपणे रक्तदान करणेही काळाची गरज आहे,असे यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पतंगशाह कुटीर रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक,वैद्यकीय अधिकारी, रक्तकेंद्र सक्षम अधिकारी, संपूर्ण वैद्यकीय कर्मचारी वर्ग यांनी दिलेले सहकार्य उल्लेखनीय आहे.सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र, जव्हार यांच्यावतीने सर्व रक्तदात्यांचे तसेच रुग्णालय प्रशासनाचे मनःपूर्वक आभार व्यक्त…

Read More