वसंत भोईर,वाडा
वैश्य समाज संघाचा वधु – वर मेळावा उत्साहात संपन्न,
मंगला हॉल कोपरी ठाणे येथे काल पालघर महाराष्ट्र वैश्य समाज संघाचा वधु वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी ठाणे पालघर तसेच रायगड व नाशिक जिल्ह्यातील अनेक वधू वर मोठ्या उपस्थित होते.३२व्या वधू वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष सीमाताई महाजन,जिल्हा संघाचे अध्यक्ष निलेशजी गंधे,समन्वय समिती प्रमुख दिलीप भोपतराव, रायगड जिल्हा वैश्य समाजाचे अध्यक्ष अशोक भोपतराव, उपाध्यक्ष प्रीयेश जगे निलेश कोंडलेकर जिल्हा महिला प्रतिनिधी पूजा काबाडी, जिल्हा उप महिला प्रतिनिधी मयुरी तोंडलीकर, समितीचे सभापती निमेष खडकबाण,चिटणीस, सह चिटणीस,विश्वस्त,सल्लागार, माजी अध्यक्ष,सभापती,गट सभापती,तसेच वधू-वर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सीमाताई महाजन यांनी वधू वर परिचय मेळाव्याचे महत्व उपस्थितांना समजावून सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक निमेष खडकबाण यांनी केले.यावेळी २२० हून अधिक वधू वर उपस्थित होते, त्यामध्ये वधूंची संख्या ६५ होती.
अध्यक्ष निलेश गंधे यांनी वधू-वर परिचय मेळाव्यासाठी गेले दोन महिने सभापती व त्यांचे समिती सदस्य, पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते मेहनत घेत होते असे सांगितले.तसेच त्यांनी ठाणे गटाचे ही आभार मानले.त्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपस्थित मान्यवरांचा,वधू वर समितीतर्फे स्वागत व सत्कार करण्यात आला.ठाणे गटाचे गटसभापती निता गुजरे तसेच ठाणे महिला अध्यक्ष वर्षा शेटे, राजन गुजरे व व त्यांचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

