दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
महायुती सरकारच्या अनेक मंत्र्यांची कामगिरी निराशाजानक,
महायुती सरकारच्या १०० दिवसातील कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयाला पाठवला आहे.सरकारमधील अनेक कॅबिनेटमंत्र्यांची कामगिरी निराशाजनक राहिल्याचे या आढाव्यात म्हंटलं आहे.
यामध्ये शिंदे गटाचे दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे,दादा भुसे,उदय सामंत,संजय शिरसाट,प्रताप सरनाईक,गुलाबराव पाटील,भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे,आशिष शेलार,चंद्रकांत पाटील,गिरीश महाजन,नितेश राणे,गणेश नाईक,अतुल सावे,मंगलप्रभात लोढा,राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार,अदिती तटकरे,माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे.या सर्वांना देण्यात आलेले टार्गेट त्यांना केवळ ३० ते ४० % पूर्ण करता आले.त्यांच्या या निराशाजनक कामगिरीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असून त्यांनी या मंत्र्यांच्या परफार्मन्सबाबत केंद्रीय नेत्याकडे आपले म्हणणे स्पष्टपणे मांडले आहे.त्यामुळे पुढे होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात यापैकी काही मंत्र्यांना नारळ मिळू शकतो.महिला व बालकल्याण समितीसारख्या महत्वाच्या विभागाच्या कामकाजात अदिती ठाकरे विशेष कामगिरी करू शकल्या नाहीत.लाडकी बहीण योजना राबवताना त्यांच्या विभागाकडून अनेक गैरप्रकार झाल्यामुळे फडणवीस नाराज झाले आहेत.त्यांच्या पक्षाचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बेताल वक्तव्यामुळे भाजपच्या ग्रामीण भागातील आमदारामध्ये प्रचंड नाराजी आहे.त्यांनाही ठरवून देण्यात आलेले उद्दिष्ट गाठता आले नाही.राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच मंत्र्यांची कामगिरी या १०० दिवसात अत्यंत निराशाजनक राहिली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षाची धुरा संभाळणे व मंत्र्यांच्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्याच्या बाबतीत कायम उदासीन राहिले.त्यामुळे त्यांच्या गटाच्या मंत्र्यांची कामगिरी अत्यन्त सुमार अशीच राहिली.नाराज झालेले गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना मुंबईत बोलावून घेतले व योग्य ती समज दिली.
या सर्व घडामोडीवरून महायुती सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याचे दिसून आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांना भाजपकडून अकार्यक्षम ठरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट होत आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उठसुठ आपल्या दरे गावी निघून जाणे,भाजपच्या पचनी पडलेले नाही.या विषयी गृहमंत्री अमित शहा देखील शिंदे यांच्यावर प्रचंड नाराज आहेत.

